बीट आपल्या सगळ्यांना माहिती आहे. एक जमिनीखाली वाढणारे कंदमुळ असून द्विवर्षायू वनस्पती असून तिचे मूळ मांसल असते. मुळाचा रंग गडद लाल, सोनेरी पिवळसर असून आकार लांबट निमुळता असतो.
फुलोऱ्यातील एकापेक्षा जास्त फुले एकत्र वाढून संयुक्त फळ तयार होते. याचे फळ बोंड स्वरूपाचे असून पिकल्यावर आडवे फुटते. या फळात 2 ते 5गोलाकार बिया असतात.
बीट हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्वपूर्ण असून यामध्ये लोह, जीवनसत्वे, फॉलिक ऍसिड आणि खनिजांचे प्रमाण चांगले असते. यामुळे रक्तातील हिमोग्लोबिन वाढते तसेच अँटिऑक्सिडंट मुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते.
तसेच उच्च रक्तदाब देखील नियंत्रण ठेवते तसेच रक्तशुद्धीकरण करते. याचे आरोग्यदायी गुणधर्म पाहून यापासून प्रक्रिया करून खाद्यपदार्थ निर्मितीला खूप संधी आहे.
बीट पासून जर विविध प्रकारचे पदार्थ तयार केले तर आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा आहारात समावेश खूप महत्त्वाचा ठरू शकतो. या लेखात आपण बिट पासून तयार करता येणारे तीन महत्त्वाचे पदार्थांची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Technology: वाळलेली फुले आणि पाने वाढवतील शेतकऱ्यांचे उत्पन्न, नवीन तंत्रज्ञान विकसित
बिट पासून तयार करण्यात येणारे प्रक्रियायुक्त पदार्थ
बीटरूट जेली
1- यासाठी अगोदर बिटाची साल काढून किसून घ्यावे. किसलेल्या बीटच्या वजनाच्या दीडपट पाणी घेऊन ते उकळत ठेवावे. या उकळत्या पाण्यात किसलेले बीट टाकून पंधरा ते वीस मिनिटे उकळून गाळून घ्यावे. 150 मिली किसलेल्या बीटा मध्ये 60 ग्रॅम साखर,0.6 ग्रॅम सायट्रिक ऍसिड मिसळून उकळावे.
2- दोन ग्रॅम पेक्टिन मिसळून सतत ढवळत ठेवून या मिश्रणाचा टी.एस.एस. हा 65 अंश ब्रिक्स आला, कि मिश्रण उकळणे थांबवावे.
त्या मिश्रणाला जेली च्या साच्यात ओतून साचे 30 ते 40 मिनिटे किमान स्थिर ठेवावे. तयार बीटरूट जेली साच्यातून काढून तयार करून साठवून ठेवावी.
बीटरूट बर्फी
1- बीटरूट स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावरील साल काढून घ्यावी आणि किसून घ्यावे. 100 ग्रॅम किसलेले बीट, 60 ग्रॅम खोबरे, 60 ग्रॅम साखर यांचे 25 मिली दुधासोबत मिश्रण तयार करावे.
2-मिश्रणाला घट्टपणा येण्यासाठी गॅसवर दहा ते पंधरा मिनिटे गरम करावे. दुसऱ्या बाजूला ट्रेमध्ये तुपाचे लेप लावून त्यावर तयार केलेल्या मिश्रणाचे जाड थर तयार करून घ्यावे.
3- तयार झालेला थर थंड करून योग्य आकारात कापून घ्यावे. तयार झालेली बीटरूट बर्फी हवाबंद डब्यामध्ये ठेवावी.
बीटरूट केक
1- मैदा हा आरोग्याला फारसा फायदेशीर नसल्याने जर त्यात बीटचा वापर केला तर केकचे पोषण मूल्ये वाढवता येऊ शकते. सर्वप्रथम 100 ग्रॅम मैदा आणि चार ग्रॅम बेकिंग पावडर एकत्र करून तीन ते चार वेळा चाळून घ्यावे.
2- दुसर्या भांड्यात 30 ग्रॅम वनस्पती तूप आणि 80 ग्रॅम साखर एकत्र करावी. यामध्ये मैदा, बेकिंग पावडर आणि 40 ग्रॅम बीटचा घर एकत्र करून हे मिश्रण केक पात्रात भरावे.
3- केक पात्र बेकिंग ओव्हनमध्ये 180 अंश सेल्सिअस तापमानाला 20 ते 25 मिनिटे बेक करावे. तयार बीटरूट केक थंड करून सीलबंद करावे.
Share your comments