शेतमालावर प्रक्रिया करणारा उद्योग म्हटला म्हणजे जास्त करून बाजारपेठेत कायम मागणी असणाऱ्या उत्पादित वस्तूंची निर्मिती होय असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही. कारण बर्याचशा वस्तू या शेतीमालावर प्रक्रिया करून तयार केलेले असतात. जर आपण लघुप्रक्रिया उद्योगाबद्दल माहिती घेतली तर या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी संधी असून शेतकरी बांधवांसाठी लघु प्रक्रिया उद्योग एक मैलाचा दगड ठरू शकतो
आता आपल्याला माहित आहेच कि, लघुउद्योग म्हणजे या उद्योगात दहा लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक असलेले आणि दोन कोटी रुपयांपेक्षा कमी गुंतवणूक असलेल्या उद्योगांचा समावेश होतो.
परंतु जर असे लघु उद्योग उत्पादन क्षेत्रात असतील तर किमान गुंतवणूक 25 लाख v जास्तीत जास्त पाच कोटींची गुंतवणूक यामध्ये असू शकतो. या लेखामध्ये आपण लघुप्रक्रिया उद्योगासाठी लागणारे कर्जाची प्रक्रिया व कागदपत्रे यांची माहिती घेणार आहोत.
नक्की वाचा:Bussiness Idea: शेतीवर आधारित 'हा' उद्योग उभारा आणि कमवा प्रचंड नफा,व्हा उद्योजक..!
लघु प्रक्रिया उद्योगासाठी कर्जाची प्रक्रिया
1- यासाठी आपले बँकेत खाते उघडणे येथून सुरुवात करणे आवश्यक आहे.
2- आपण जो काही लघु प्रक्रिया उद्योग उभारणार आहोत त्याची एकंदरीत योजना अशा पद्धतीचे असावी की आपण आपल्या सोबत जास्तीच्या लोकांना रोजगार देऊ शकतो किंवा आपण उभारत असलेल्या लघु प्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध होईल, हा विश्वास सर्वप्रथम बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.
3- आता शासनाच्या विविध प्रकारच्या योजना यासाठी कर्ज सुविधा उपलब्ध करून देतात. त्यासाठी आपल्याला अगोदर जे कर्ज घ्यायचे आहे ते नेमके कोणत्या योजनेच्या माध्यमातून घ्यायचे आहे हे नीट ठरवणे गरजेचे आहे.
4- आपल्याला लागणारे कर्ज किती लागू शकणार आहेत त्यानुसार त्या पद्धतीचे कर्ज देणारी नेमकी योजना कोणती याचा विचार करून योजनेची निवड करावी.
5- आपल्यालाच ज्या बँकेतून कर्ज घ्यायचे आहे त्या बँकेशी संपर्क साधावा व घेत असलेल्या कर्जाची संपूर्ण प्रक्रिया नेमकी काय आहे, याबद्दल तपशीलवार माहिती करून घ्यावी व नंतरच बँकेच्या कर्जाचा फॉर्म भरावा.
6- आपण ज्या व्यवसायासाठी कर्ज बँकेकडे मागतो, त्या व्यवसायाचे एकंदरीत नफा व तोटा याचे गणित या बद्दल बँक आपल्याकडून संपूर्ण माहिती घेऊ शकते. त्यामुळे तुम्ही सगळ्या गोष्टीत अपडेट राहणे गरजेचे आहे.
7- तसेच तुम्हाला कागदपत्र पैकी आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी एखाद्या ओळखपत्र असणे आवश्यक आहे.
8- समजा तुम्ही अनुसूचित जाती- जमाती, ओबीसी किंवा जनरल कॅटेगरीतून येत असाल तर त्या संबंधीचे सर्टिफिकेट देखील देणे गरजेचे आहे.
9- समजा तुमचा व्यवसाय अगोदरपासून स्थिरस्थावर आहे व तुम्हाला तुमच्या चालू व्यवसायासाठी कर्ज घ्यायचे असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन वर्षापासून आयकर आणि वीज बिल इत्यादी संपूर्ण कागदपत्रे जोडावी लागतात.
लघु प्रक्रिया उद्योगासाठी या योजनांच्या माध्यमातून घेऊ शकता कर्ज
1- प्रधानमंत्री मुद्रा योजना
2- पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम
3- प्रधानमंत्री रोजगार योजना
4- लघु व मध्यम उद्योजकांना क्रेडिट गॅरंटी फंड योजना
5- क्रेडिट निगडित भांडवली अनुदान योजना
Share your comments