यंदाही पावसाची दमदार सुरुवात होणार आहे. पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या तुलनेत ९८ टक्के पावसाचा अंदाज स्कायमेट (Skymet) या खासगी हवामान संस्थेने मंगळवारी जाहीर केला आहे. यंदाचा मान्सून सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण असेल. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. मॉन्सून हंगामाच्या पहिल्या टप्प्यात उत्तरार्धाच्या तुलनेत चांगले पाऊसमान राहील.
पावसाची दमदार सुरुवात
यंदाही पावसाची दमदार सुरुवात होणार आहे. जूनच्या सुरुवातीला मान्सूनची सुरुवात चांगली होईल. असे स्कायमेटने म्हटले आहे. तर देशभरात सरासरीच्या ९८ टक्के पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. देशात यंदा दुष्काळ (Drought) पडण्याची शक्यता नाही.
कोणत्या महिन्यात किती पाऊस
जून १०७ %
जुलै १०० %
ऑगस्ट ९५ %
सप्टेंबर ९० %
Milk FRP : दूध उत्पादकांना न्याय मिळवून देण्यासाठी शेतकरी संघटना आक्रमक; नव्या संघर्षाचा आरंभ
जुलै आणि ऑगस्टच्या मुख्य मान्सून महिन्यांत केरळ आणि उत्तर अंतर्गत कर्नाटकात पाऊस कमी पडेल. उत्तर भारतातील कृषी क्षेत्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या पावसावर आधारित भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. त्याचबरोबर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस होईल. एकूण सरासरीच्या ९६ ते १०४ टक्के पाऊस हा सरासरीइतका म्हणजेच सर्वसाधारण मानला जातो. त्या तुलनेत पावसाची ९८ टक्के शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Skymet : वेधशाळेचा अंदाज आला रे; महाराष्ट्रात असा असणार मान्सून...
Prickly Pear : निवडुंगाची लागवड करा; आणि मिळवा लाखोंचा नफा
Share your comments