MFOI 2024 Road Show
  1. हवामान

दिलासादायक शक्यता: एप्रिलमध्ये तापमानाने मोडला 122 वर्षांचा विक्रम, मे मध्ये 109% पूर्वमोसमी पावसाची शक्यता

सध्या भारताच्या बहुतांशी राज्यांमध्ये उष्णतेची प्रचंड लाट सुरू असून अक्षरशः नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी नव्हे एवढी उष्णता या वर्षी जाणवत आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
tempreture break the record in 122 years and guess in may will be 109 percent unseasonal rain

tempreture break the record in 122 years and guess in may will be 109 percent unseasonal rain

 सध्या भारताच्या बहुतांशी राज्यांमध्ये उष्णतेची प्रचंड लाट सुरू असून अक्षरशः नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. कधी नव्हे एवढी उष्णता या वर्षी जाणवत आहे.

यामध्ये महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पारा हा 42 अंश याच्यापुढे आहे. त्यामुळे अंगाची लाही लाही करणाऱ्या उकाडा वातावरणात आहे. जेव्हापासून उन्हाळा सुरू झाला आहे तेव्हापासून विचार केला तरी एप्रिल महिना हा जास्त तापदायक ठरला. एप्रिल मध्ये तापमानाने चक्क 122 वर्षाचा विक्रम मोडीत काढला. एप्रिल महिन्यामध्ये वायव्येकडे व भारतात एप्रिल महिना सर्वात उष्ण राहिला. जर भारतातील वायव्येकडील नऊ राज्यांचा विचार केला तर यामध्ये जम्मू काश्मीर, लडाख, हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरियाणा, राजस्थान, दिल्ली व उत्तर प्रदेशात एप्रिल मध्ये सरासरी तापमान 35.90 अंश नोंदवले गेले जे सामान्य पेक्षा 3.35 डिग्री अधिक होते. त्याचप्रमाणे गुजरात, महाराष्ट्र, गोवा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशात सरासरी तापमान 37.78 डिग्री नोंदवले गेले. जे सामान्य तापमानापेक्षा 1.49 अंशानी अधिक होते.

 2010 नंतर सर्वाधिक उष्ण लाट, पाच वर्षात होणार सर्वाधिक पाऊस

1- आय एम डी चे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्र म्हणाले, एप्रिल मध्ये देशाचे सरासरी तापमान 33.94 अंश राहते. परंतु या वर्षी ते 35.5 डिग्री इथपर्यंत नोंद झाले.

2- यापेक्षा जास्त सरासरी तापमान एकशे बावीस वर्षाच्या इतिहासात केवळ तीन वेळा एक म्हणजे 1973 मध्ये 35.30 डिग्री, 2016 मध्ये 35.32 डिग्री या आणि 2010 मध्ये 35.42 डिग्री नोंद झाले होते.

3- यावर्षी देशांमध्ये उष्णतेच्या लाटेचे दिवस अनेक गंभीर उष्माच्या लाटेचे दिवस 2010 नंतर सर्वाधिक राहिले. एप्रिल मध्ये एकूण सहा पश्चिमी विक्षोभ आले पण त्यापैकी केवळ एक किरकोळ परिणाम करू शकला.

4- वायव्य भारतात मार्च आणि एप्रिल महिना कोरडा राह्यला.. वायव्य पूर्व मोसमी पाऊस सामान्य पेक्षा 84 टक्के आणि दक्षिण भारतात सामान्य पेक्षा 54 टक्के कमी झाला.(स्रोत-दिव्यमराठी)

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:Pm Kisan : -केवायसी केली नाही तरी मिळणार का पीएम किसान योजनेचा 11वा हफ्ता; काय सांगितलं सरकारने

नक्की वाचा:मे महिन्यात उन्हाळ्यापासून लोकांची होतेय सुटका! मात्र अमरावती मध्ये उष्माघाताने घेतले बळी

English Summary: tempreture break the record in 122 years and guess in may will be 109 percent unseasonal rain Published on: 02 May 2022, 09:47 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters