Rain Update: यंदा पावसाने उशिरा सुरुवात केली. पण आता चांगला जोर धरला आहे. गेल्या आठवड्यापासून राज्यात सर्वत्रच पावसानं दमदार हजेरी (Weather Update) लावली आहे. त्यामुळे शेतीच्या कामांनाही वेग आला आहे. काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आहे त्या ठिकाणी मात्र शेतीची काम जोमात सुरू आहेत.
सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट
राज्यातील काही भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. राज्यातल्या सात जिल्ह्यांना हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये पुणे, सातारा, रत्नागिरी ,रायगड, पालघर गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. या भागात मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हे ही वाचा: ब्रेकिंग! शिंदे सरकार पडणार की टिकणार, सर्वोच्च न्यायालयाचे विधानसभा अध्यक्षांना निर्देश, आमदारांवर...
Corona Update: चिंता वाढली: कोरोना रुग्ण संख्या कमी, मात्र मृत्यू संख्या वाढली
या भागाला ऑरेंज अलर्ट
नाशिक, ठाणे, मुंबई, औरंगाबाद जालना, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर आणि गोंदिया या भागाला ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच हिंगोली नांदेड परभणी भंडारा या भागाला हवामान खात्याकडून येलो अलर्ट देण्यात आला आहे. पुढील तीन-चार दिवसांमध्ये कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आली आहे.
हे ही वाचा: Corona Update : जगभरात पुन्हा वाढले कोरोना रुग्ण; धक्कादायक आकडेवारी आली समोर..
Rain Update: पुढील चार दिवस धोक्याचे; 'या' भागात रेड अलर्ट
पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यात विशेष म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
Share your comments