Mumbai Rain: पुढील पाच दिवस कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मुंबईत कालपासून मुसळधाक पाऊस पडतोय. मुंबईसह उपनगरांमध्ये हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट दिला आहे.
मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. आज मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर बीएमसी आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग अलर्ट पॉईंटवर मोडवर आहेत.
मुंबईत आज सकाळपासूनच जोरदार पाऊस सुरु आहे. त्याचे परिणाम मुंबईत पाहायला मिळत आहेत. सखल भागामध्ये पाणी साचले आहे. वाहतूक पूर्णपणे मंदावली आहे. नागरिकांना साचलेल्या पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
IMD Alert: राज्यातील 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता
मुंबई उपनगरातही पावसाची संततधार ही सुरू आहे. त्याचा फटका मुंबईच्या जनजीवनावर पाहायला मिळत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं आहे. भांडुप एल बी एस मार्ग पन्हालाल कंपाऊंड जवळ रस्त्यावर पाणी साचल्यामुळे एल बी एस मार्गावरील ठाण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक ही प्रभावीत झाली आहे.
मुलुंड, विक्रोळी, घाटकोपर, कांजुर परिसरातदेखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. उपनगरीय रेल्वे वाहतुकीवर मात्र या पावसाचा फारसा परिणाम झालेला दिसून येत नाही. पूर्व द्रुतगती मार्गावरील वाहतूक देखील सुरळीत सुरू आहे.
Share your comments