1. हवामान

Rain Update: मुंबई पुन्हा तुंबली…! राजधानीत पावसाचं तांडव, मुंबईसमवेतचं 'या' ठिकाणी उद्या पण मुसळधारा; IMDचा अंदाज

Rain Update: राजधानी मुंबईत पाऊस (Rain) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अंधेरी, कुर्ल्यासह अनेक भागात सकाळपासून मुसळधार असा पाऊस (Heavy Rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai Rain Update) अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
mumbai rain update

mumbai rain update

Rain Update: राजधानी मुंबईत पाऊस (Rain) थांबण्याचे नाव घेत नाही आहे. अंधेरी, कुर्ल्यासह अनेक भागात सकाळपासून मुसळधार असा पाऊस (Heavy Rain) पडत आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील (Mumbai Rain Update) अनेक रस्ते जलमय झाले आहेत.

पाणी साचल्याने अनेक भागात तलावाप्रमाणे दृश्य बघायला मिळत आहेत. दरम्यान, 8 जुलैपर्यंत पाऊस थांबण्याची शक्यता नाही, अशी माहिती हवामान खात्याने (IMD) दिली आहे.

IMD ने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे

IMD ने मुंबई आणि आसपासच्या अनेक ठिकाणी ऑरेंज अलर्ट (Orange Alert) जारी केला आहे. पावसाळा (Monsoon) सुरू होताच तापमानातही घट झाली आहे. मुंबईत जेव्हा कधी मुसळधार पाऊस पडतो तेव्हा तेथील रस्ते पाण्याखाली जातात. आता देखील असच काहीस बघायला मिळत आहे.

अनेक भागात पूरसदृश परिस्थिती

मुसळधार पावसामुळे छोट्या-छोट्या भागातून शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर चार फूट पाणी साचल्याने वाहतूकही ठप्प झाली आहे. नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून, अनेक गावात पूरसदृश स्थिती दिसून आली आहे.

बुधवारी रस्त्यावरून ऑटो रिक्षा गायब राहिल्या. त्यामुळे लोक पायी ये-जा करतांना बघायला मिळाले आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचले आहे. वसई-विरारमधील सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांचे प्रचंड हाल झाले आहेत.

दुकाने व घरांमध्ये पाणी साचल्याने मोठे नुकसान झाले आहे. एकंदरीत राजधानी मुंबईत पावसाचं तांडव बघायला मिळत आहेत. यामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाल्याचे चित्र आहे.

दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) मुंबई समवेतच मुंबईच्या आजूबाजूच्या जिल्ह्यात आठ जुलै पर्यंत मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे पुढील काही तास नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

English Summary: rain update imd gave heavy rain alert to mumbai Published on: 07 July 2022, 03:02 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters