Rain Update: हवामान विभागाने (Meteorological Department) सांगितलेल्या अंदाजानुसार या वर्षी मान्सून (Monsoon) लवकर दाखल होणार होता, पण मान्सून लवकर काही दाखल झाला नाही. मान्सूनने सर्वांना वाट पाहायला लावली.
पण आता मान्सून अखेर कोकणात (Kokan) दाखल झाला आहे. पण आता तावरण ढगाळ होत आहे, सोसाट्याचा वाराही वाहत असून पावसासाठी पोषक वातावरण असले तरी पावसाची चिन्हे नाहीत. थोडक्यात, यंदाचा मान्सून लांबला नसला तरी त्याचा वेग मंदावल्याचे स्पष्ट होत आहे.
जूनचा मध्य संपत आला तरी महाराष्ट्रात अजूनही मान्सून हवा तसा स्थिर झालेला नाही. कोकण आणि मध्य महाराष्ट्र ओलांडून मराठवाड्यात मान्सून दाखल झाल्याचे हवामान खात्याने सांगितले. मात्र, पावसाचे प्रमाण कमी असल्याचे सांगण्यात येत आहे.
पाऊस आला रे..! तुमच्या भागात कधी पाऊस पडणार जाणून घ्या...
येत्या दोन दिवसांत राज्यातील अनेक भागात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. एकीकडे पाऊस थांबला नसल्याने वरुण राजा स्थिरावत नाही तोपर्यंत पेरणीची घाई करू नये, असा सल्ला हवामान खात्याकडून दिला जात आहे.
मान्सूनने आतापर्यंत कोकणात चांगलाच कहर केला आहे. तो 11 जून रोजी मुंबई, पालघर, रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर येथे पोहोचला आहे. राज्यातील इतर भागात मान्सून कधी पडणार याबाबत थोडी साशंका आहे.
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! 14 खरीप पिकांसह 17 पिकांच्या MSP मध्ये मोठी वाढ, जाणून घ्या सविस्तर
Share your comments