Rain Update: राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. राज्यात अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान खात्याकडून राज्यात पुढील 3 दिवस म्हणजे 10 जुलैपर्यंत अतिवृष्टी तर कोंकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (64 ते 200 मिमी) पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
'या' भागात रेड अलर्ट
राज्यात पुढचे चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्यता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे सातारा, कोल्हापूरात आज रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो. विदर्भातही चांगला पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.
मोठी बातमी : "शिवसैनिकांनो नव्या चिन्हासाठी तयार राहा"; उद्धव ठाकरेंचे मोठे विधान
पालघर जिल्ह्यात भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यात एनडीआरएफ ची एक टीम तैनात आहे.
PM Kisan Yojana : कामाची बातमी.! 'या' तारखेला बँक खात्यात येणार 12 व्या हप्त्याचे पैसे
पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी जोरदार पाऊस सुरुच आहे. त्यात विशेष म्हणजे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. पुणे विभागात पुणे, सातारा, सांगली या जिल्ह्यातील परिस्थिती सामान्य असून जिल्ह्यात कुठेही पूर परिस्थिती नाही. तसेच सर्व नद्या इशारा पातळीच्या खाली वाहत आहेत. सर्व प्रकारची वाहतूक सुरळीत सुरु असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारचे मंत्रिमंडळ विस्ताराचे ठरलं तर..! पाहा कसा असणार फॉर्म्युला?
Share your comments