राज्यातील शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत असताना आज पासून मुंबई आणि मुंबई परिसरात पावसाला सुरुवात झाली असून हवेत चांगल्या प्रकारचा गारवा पसरला आहे.परंतु राज्याच्या इतर भागांमध्ये अजूनही हवा तेवढा पाऊस नाही.
शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी ची तयारी पूर्ण केली असून पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरम्यान येत्या चार दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली असून
पुढील दोन दिवस राज्यातील विविध भागांमध्ये वादळी वाऱ्या ची शक्यता असून त्यानंतरच्या तीन दिवसांपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये सुरुवातीला पावसाने चांगली हजेरी लावली होती.
या पावसाने शेतकऱ्यांना एक आशादायक चित्र निर्माण केलेव शेतकरी राजांनी पावसामुळे पेरणीपूर्व वेगाने केली. त्यानंतर पावसाने दडी मारली व शेतकरी पेरणीसाठी चांगले पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे पावसाचे आगमन लवकर होणे खूप गरजेचे आहे.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो थांबा!! राज्यात केवळ एक टक्केच पेरणी, पावसाअभावी पेरण्या थांबल्या...
कारण शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील कृषी विद्यापीठे आणि कृषी तज्ज्ञांकडून याबाबत शेतकऱ्यांना सल्ला दिला गेला
आहे की 75 ते 100 मिलिमीटर पाऊस केव्हा पडेल तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणीचा विचार करावा,नेता दुबार पेरणीचे संकट येऊ शकते असे देखील कृषी तज्ज्ञांनी सल्ला दिला आहे.
नक्की वाचा:Monsoon Update: पाऊस आला रे…! उद्यापासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार: भारतीय हवामान विभाग
राज्यात पेरण्या खोळंबल्या
अजूनही हवा तेवढा पाऊस होत नसल्यामुळे संपूर्ण राज्यात पावसाच्या अभावी पेरण्या रखडल्या आहेत. हवामान खात्याने जाहीर केले होते की पूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला परंतु प्रत्यक्षात राज्यभरात पावसाची प्रतीक्षा आहे.
आता जून महिना संपत आला तरी सुद्धा चांगला पाऊस नसल्याकारणाने केवळ पूर्ण राज्यात एक टक्का इतिहास पेरणी झाली आहे.
एकूण पेरणी क्षेत्राचा विचार केला तर महाराष्ट्रातील खरिपाच्या दीड कोटी हेक्टर क्षेत्रापैकी17 जून पर्यंत अवघा एक लाख 47 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे.
मागच्या वर्षी याच कालावधीत 17 जूनपर्यंत पावणेपाच लाख हेक्टरवर पिकांची पेरणी झाली होती. त्यामुळे पावसाचे आगमन लवकर व्हावे व चांगला पाऊस व्हावा हीच अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.
नक्की वाचा:Monsoon Update: पाऊस आला रे…! उद्यापासून पुन्हा मान्सून सक्रिय होणार: भारतीय हवामान विभाग
Share your comments