दिलासादायक बातमी समोर आली आहे. यावर्षी मान्सून (Monsoon Updates) वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत. (Meteorological Department) देशभरातील शेतकरी (Farmer) आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहे. त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत.
मान्सूनचे अंदमान येथे आगमन झाले असून लवकरच राज्यात देखील आगमन होणार आहे. सहा दिवस आधीच 16 मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. मान्सून केरळमध्ये 27 मे रोजी दाखल होण्याचा अंदाज आहे. आता मात्र त्याआधीच मान्सून दाखल होण्याची शक्यता अधिक वर्तवली जात आहे.
हातात पैसे टिकत नाहीत का? मग करा 'हा' एकच उपाय; कायम राहणार खिशात पैसे
कोकणातील मान्सूनची तारीख ठरली..!
पावसाची सर्वांना प्रतिक्षा लागून असून मान्सूनचे वेध लागले आहे. १६ मे रोजी मान्सून अंदमानच्या समुद्रात दाखल झाला आहे. भारताच्या दिशेने सरकत असलेला मान्सून केरळमध्ये २७ मे रोजी पोहचणार असून नैऋत्य मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रात ५ जूनला तळ कोकणात मान्सून दाखल होईल. मान्सून वेळेपूर्वी दाखल होण्याचे संकेत आहेत. एकूणच महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस होण्याचा अंदाज आहे.
युरिया खत खरेदीसाठी नवा नियम लागू; तीन गोण्यांसोबत घ्याव्या लागणार "या" दोन बाटल्या
हवामान विभागाने यंदाही वेळे आधीच पाऊस दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. केरळमध्ये मान्सून साधारणपणे १ जून रोजी दाखल होतो. परंतु, यंदा वेळे आधी म्हणजे २७ मे रोजी केरळात मान्सूनचं आगमन होणार असल्याची माहिती भारतीय हवामान खात्याने दिली आहे.
Share your comments