IMD Alert : भारतीय हवामान विभागाने (IMD) नागरिकांना खुशखबर दिली आहे. हवामान खात्याने आयएमडीने (IMD) सांगितले की, मान्सूनने केरळमध्ये 29 मे रोजी म्हणजे सामान्यपेक्षा तीन दिवस आधी मान्सून दाखल झाला आहे.
केरळ मध्ये मान्सून दाखल
गेल्या वर्षी पेक्षा यंदा केरळमध्ये तीन दिवस आगोदर मान्सून दाखल झाला आहे. केरळमध्ये मान्सून सुरू झाल्यानंतर देशातील विविध राज्यांमध्ये मान्सूनची प्रतीक्षा तीव्र झाली आहे. त्याचबरोबर आता कर्नाटक आणि महाराष्ट्रातही मान्सूनपूर्व हालचाली वाढण्याची शक्यता आहे.
केरळमध्ये पुढील 5 दिवस ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह वादळी वारे आणि पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
राज्यातील पावसाची तारीख ही ठरली
भारतीय हवामान विभागाच्या नुसार (IMD), महाराष्ट्रात १० जून पर्यंत मान्सूनचे आगमन होणार आहे. महाराष्ट्रातील तळकोकण गाठल्यानंतर मान्सून हा अवघ्या चार दिवसात मुंबईत प्रवेश करत असतो. यामुळे मान्सूनची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी निश्चितच ही दिलासा देणारी बाब आहे.
7th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! लवकरच वाढणार पगार, जाणून घ्या का?
30 मे पासून राजधानी मुंबईसह (Mumbai) अनेक प्रमुख जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. मुसळधार पावसाची प्रक्रिया 3 जूनपर्यंत सुरू राहण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
Share your comments