1. हवामान

मराठवाड्यासाठी खूशखबर! मराठवाड्यात यंदा पडेल मान्सूनच्या सरासरीइतका पाऊस- ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. साबळे यांचा अंदाज

मराठवाडा म्हटले म्हणजे कायम दुष्काळप्रवण पट्ट्यात असलेला भाग होय. या पट्ट्यामध्ये बऱ्याचदा दुष्काळसदृश्य परिस्थिती असते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
meterological expert dr.ramchandra sable guess about mansoon in marathwada

meterological expert dr.ramchandra sable guess about mansoon in marathwada

मराठवाडा म्हटले म्हणजे कायम दुष्काळप्रवण पट्ट्यात असलेला भाग होय. या पट्ट्यामध्ये बऱ्याचदा दुष्काळसदृश्य परिस्थिती असते.

परंतु हवामान शास्त्रज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार यंदामराठवाड्यात मान्सून चा सरासरीइतका म्हणजे 679.5 मिमी पाऊस पडेल.काही ठिकाणी जोरदार तर काही दुष्काळी तालुक्यांमध्ये सुरुवातीला कमी तर ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान जास्त पाऊस पडेल असा अंदाज त्यांनी वर्तवला. सध्या निनाचा प्रभाव कायम असल्यामुळे बाराही महिने पावसाची नोंद होत असून आता चालू च्या एप्रिल आणि मे महिन्यात देखील पाऊस पडणारआहे.

नक्की वाचा:स्वयंपूर्णता! रशिया आणि युक्रेन कडून इजिप्तला होणाऱ्या गहू निर्यातीची पोकळी भरली भारताने, इजिप्तला केला गहू निर्यात

 सध्याचे वातावरणीय स्थिती

 सध्या प्रशांत महासागराच्या पृष्ठभागाचे पाण्याचे तापमान थंड राहिल्यामुळे त्या ठिकाणी हवेचा दाब वाढत आहे वआपल्याकडे वारे वाहत आहेत. एवढेच नाही तर अरबी समुद्र तसेच बंगालचा उपसागर व हिंदी महासागर यांच्या भूपृष्ठाचे पाण्याचे तापमान सरासरीपेक्षा तीन अंशांपर्यंत वाढले असल्यामुळे या ठिकाणाहून बाष्पयुक्त वारे प्रशांत महासागराकडे न जाता इकडेच वाहून येत आहेत.

या सगळ्या परिस्थितीमुळे आकाशात उष्ण, बाष्पयुक्त तसेच थंड वाऱ्यांचा मिलाफ होऊनआकाशात ढगांची निर्मिती होत आहे तसेच हवेचा 1006 कमी दाब निर्माण झाला आहे.  या सगळ्या परिस्थितीचा परिपाक म्हणून उत्तर महाराष्ट्रात 18 एप्रिल ते 15 मे दरम्यान अधून मधून हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण होईल अशा ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. बाकीच्या ठिकाणी तापमानामध्ये चढ-उतार होतील. तसेच ला निनाचा प्रभाव कायम राहिल्याने मान्सूनपूर्व ते उन्हाळ्यात पाऊस पडण्याचे प्रमाण वाढल्याचे देखील साबळे यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.मार्च चा शेवटचा आठवडा ते एप्रिल चा पूर्ण पंधरवडा चांगलाच तापला असल्यामुळे तापमान 40 ते 41.8अंश सेल्सिअस उच्चांक पातळीवर जाण्याची नोंद झाली आहे.

नक्की वाचा:Animal Husbandry: 'या' म्हशीचे पालन करा आणि कमवा बक्कळ पैसा; वाचा याविषयी

हे तापमान चांगला पाऊस आणण्यासाठी उपयुक्त ठरत असल्याचे देखील डॉ. साबळे यांनी स्पष्ट केले. डॉ. साबळे यांनी स्वतंत्र असे हवामान शास्त्र अभ्यासाचे केंद्र तयार केले आहे. या केंद्रामध्ये रेनगेज, तापमापक इत्यादी तंत्रज्ञान बसवले आहे. तसेच कृषी विद्यापीठ,  हवामान वेधशाळेचा डेटा संकलित करून व त्याचा अभ्यास करून हवामानाचा अचूक अंदाज वर्तवतातएवढेच नाही तर त्यांच्या मॉडेलला भारत सरकारचे पेटंट देखील मिळाले आहे.(स्त्रोत-दिव्य मराठी)

English Summary: meterological expert dr.ramchandra sable guess about mansoon in marathwada Published on: 18 April 2022, 11:01 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters