सध्या खूपच तीव्र आणि तापदायक उन्हाळा सुरू असून अंगाची लाहीलाही करणारा उकाडा सध्या वातावरणात आहे. परंतु या लाही लाही करणाऱ्या उघडा मध्ये एक थंड गारवा देणारी बातमी समोर आली आहे.
ही बातमी म्हणजे यावर्षी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मान्सूनच्या मार्गक्रमणा मध्ये अगोदर मान्सून अंदमान मध्ये दाखल होतो. त्यानुसार तो 20 ते 21 मे पर्यंत अंदमान मध्ये दाखल होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. अंदमान अंतर आपल्याला माहित आहेच की मान्सून केरळमध्ये दाखल होतो. त्यामुळे वरील अंदाजानुसार सर्व काही तो वातावरणीय स्थिती तशीच राहिली तर 28 ते 30 मे पर्यंत मान्सून केरळ मध्ये धडक देईल अशी शक्यता आहे. केरळमध्ये दाखल झाल्यानंतर सात दिवसांनी मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन होते. त्यानुसार कोकणामध्ये सात जून आणि त्याच्यानंतर तीन ते चार दिवस म्हणजेच 11 जून पर्यंत मान्सून मुंबईत दाखल होऊ शकतो.
ही स्थिती आहे कारणीभूत मान्सून लवकर येण्यासाठी
अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या वातावरणीय बदलांमुळे मान्सूनचे आगमन यावर्षी लवकर होणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.
याविषयीचा अंदाज युरोपियन सेंटर फॉर मिडीयम रेंज वेदर या संस्थेच्या वतीने जाहीर करण्यात आला आहे. मागच्या वर्षी देखील मान्सून लवकर येईल असा अंदाज होता मात्र चक्रीवादळामुळे त्याच्या वेळापत्रकात बदल होऊन तो लांबणीवर पडला होता. यावर्षी अडचण कुठलीही आली नाहीतर मान्सून लवकर दाखल होण्यास पोषक परिस्थिती आहे. या संस्थेने वर्तवलेल्या अंदाजानुसार जर मान्सूनची स्थिती राहिली तर आणि त्यासोबत लवकर दाखल झाल्यास महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा खूप मोठा फायदा मिळणार आहे. या वर्षी पावसाचा सर्वसाधारण अंदाज वर्तवण्यात आला असून सामान्य पाऊस पडला तरी शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे. आपल्याला माहित आहेच की भारतीय अर्थव्यवस्था शेतीवर आधारित असून भारतीय शेती ही मान्सूनच्या पावसावर अवलंबून आहे. जवळ जवळ भारतातील एकूण पेरणी क्षेत्रापैकी 40 टक्के पेरणी क्षेत्र मान्सूनवर अवलंबून आहे.
यासंबंधी भारतीय हवामान विभागाने लवकर मान्सूनची वाटचाल जाहीर केली नसली तरी यावर्षी मान्सून लवकर दाखल होण्याची शक्यता पाहता या संबंधीचा अंदाज व्यक्त होण्याची अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या
नक्की वाचा:रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या रेपो दर वाढीचा तुमच्यावर काय परिणाम होईल?
Share your comments