मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांसाठी (Farmers) तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) येत्या दोन दिवसात राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
राज्यात मान्सून आगमन होण्यास अजून उशीर असला तरीदेखील मान्सूनपूर्व पावसाच्या (Pre Mansoon Rain) अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेमध्ये मोठी आनंदाचे वातावरण बघायला मिळत आहे. यादरम्यान मान्सून कर्नाटक मध्ये विश्रांती घेत असल्याचे भारतीय हवामान विभागाने स्पष्ट केले असून आगामी काही दिवसात मान्सून हा संपूर्ण महाराष्ट्र व्यापणार आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते येत्या दोन दिवसात मध्ये महाराष्ट्रात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस होणार आहे. दरम्यान मोसमी वारे अरबी समुद्रात रेंगाळत आहेत. खरं पाहता जूनच्या पहिल्या आठवड्याच्या शेवटी तळकोकणात मान्सून दाखल होणार होता मात्र आता मान्सून कर्नाटक मध्ये अडकला असून मान्सून प्रवासात अडथळे येत असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
उद्यापासून म्हणजेच 8 तारखेपासून महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात मान्सूनपूर्व पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि लातूर या जिल्ह्यात पूर्व मोसमी पावसाचा अंदाज आहे.
या दरम्यान भारतीय हवामान विभागाच्या मते, मान्सूनच्या प्रगतीसाठी पूर्व मोसमी पावसाचा उपयोग होणार आहे. मान्सूनचा पाऊस दक्षिण कर्नाटकात थांबला आहे.
त्याठिकाणी कारवार, चिकमंगलळूर, बंगळूर, धर्मापुरी दरम्यान स्थिर झाला आहे. कर्नाटकात रेंगाळलेल्या मान्सूनला बळकटी मिळाल्यास तो महाराष्ट्रात पुढील वाटचाल करणार आहे आणि त्यानंतरच महाराष्ट्रातील मान्सून आगमनाबाबत काय ती स्थिती स्पष्ट होणार आहे.
खरं पाहता या वर्षी मान्सून हा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी मान्सून हा एक जूनला केरळमध्ये प्रवेश घेत असतो मात्र यावर्षी मान्सून हा 29 मे ला केरळमध्ये दाखल झाला. यामुळे महाराष्ट्रात देखील वेळेआधीच मान्सून दाखल होणार होता.
मात्र मध्यंतरी मान्सूनच्या प्रवासात अडथळे निर्माण झाल्याने अजूनही मान्सून हा महाराष्ट्रात दाखल झालेला नाही. मान्सून हा सध्या कर्नाटकात असल्याचे भारतीय हवामान विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मान्सून हा आता 12 जून च्या सुमारास महाराष्ट्राची वेश गाठणार असल्याचे पुणे वेधशाळेच्या प्रमुख हवामान तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.
Share your comments