Mansoon 2022: राज्यातील नव्हे-नव्हे तर देशातील सर्व शेतकरी बांधव (Farmers) गेल्या अनेक दिवसांपासून मान्सूनची (Mansoon) आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र यावर्षी मान्सून हा राज्यात उशिरा दाखल होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पश्चिम आणि मध्य भारतात भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) उष्णतेची लाट (Heat Wave) कायम राहणार असल्याचे सांगितले आहे.
मान्सून (Mansoon Rain) हा यावर्षी 29 तारखेला केरळ मध्ये दाखल झाला असून सध्या मान्सून हा कर्नाटकच्या सीमाभागात रेंगाळला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आता नव्याने वर्तवलेल्या आनंदाजानुसार, मान्सून 15 जूननंतर वेगाने प्रवास करणार आहे.
यामुळे 15 जून नंतर देशातील अनेक भागात मान्सूनचा पाऊस बरसणार असल्याचे सांगितले जातं आहे. म्हणजेच शेतकरी बांधवांना तसेच उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला अजून एक आठवडा मोसमी पावसाची वाट बघावी लागणार आहे.
यामुळे अजून काही काळ शेतकरी बांधवांना मान्सूनची प्रतीक्षा करावी लागणार आहे. दरम्यान कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यासाठी घाई करू नये कमीत कमी 100 मिलीमीटर पावसाची नोंद झाली तरच पेरणी करावी अन्यथा शेतकरी बांधव दुबार पेरणी करावी लागू शकते.
राज्याचे कृषिमंत्री दादाजी दगडू भुसे यांनी देखील शेतकरी बांधवांना असाच काही सल्ला दिला आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, दरवर्षी 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा मान्सून या वर्षी 29 मे ला दाखल झाला त्यामुळे राज्यात मान्सून हा लवकर येणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज होता.
मात्र, दरवर्षी 7 जूनला राज्यात दाखल होणारा मान्सून यावर्षी अजूनही दाखल झाला नसल्याने शेतकरी बांधवांच्या चिंता वाढल्या आहेत. निश्चितच यावर्षी मान्सून लवकरच दाखल होणार असल्याचा भारतीय हवामान विभागाचा अंदाज फोल ठरला असून आता शेतकरी बांधवांना मान्सूनसाठी अजून काही काळ वाट बघावी लागणार आहे.
Share your comments