देशात अगदी शेतकऱ्याच्या बांधापासून ते कृषी विभागाच्या (Agriculture Department) कार्यालयापर्यंत सर्वत्र मान्सूनच्या (Mansoon) मोठ्या चर्चा रंगल्या आहेत. सर्वांनाच मान्सून केव्हा दाखलं होईल हे जाणुन घायचं आहे. दरम्यान हवामान विभागाने (Indian Meteorological Department) वर्तवलेला मान्सून बाबतचा अंदाज चुकला आहे.
हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, मान्सून हा 27 मे ला केरळमध्ये (Mansson Arrival In Kerala) धडकणार होता. मात्र मान्सूनच्या प्रवासात अडथळा निर्माण होत असल्याने मान्सून केरळमध्ये अद्याप आलेला नाही. मान्सून सध्या श्रीलंके जवळ विश्रांती घेत आहे.
दरम्यान सहा दिवसांपूर्वी मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला होता. आता मान्सूनची आगेकूच सुरु झाली असून मान्सूनचे केरळ आगमन काही दिवस लांबणीवर पडलं आहे.
भारतीय हवामान विभागाच्या मते, 27 मे ला केरळ मध्ये येणारा मान्सून आता चार दिवस उशिरा केरळमध्ये दाखल होणार आहे. यामुळे निश्चितच शेतकऱ्यांसमवेत उकाड्याने त्रस्त झालेल्या जनतेस अजून काही काळ मान्सूनची वाट बघावी लागणार आहे.
मित्रांना आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, केरळमध्ये मान्सून चे आगमन झाल्यानंतर अवघ्या चार दिवसात मान्सून हा तळकोकण गाठत असतो. मात्र आता मान्सून केरळमध्येचं उशिरा येणार असल्याने महाराष्ट्रातील तळकोकणात देखील मान्सून हा चार दिवस उशिरा दाखल होणार असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे.
खरं पाहता या वर्षी मान्सूनसाठी आसनी चक्रीवादळामुळे पोषक वातावरण तयार झाले होते. यामुळे या वर्षी मान्सून हा नेहमीपेक्षा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने तसेच हवामानाचा अंदाज वर्तवणा-या खासगी संस्था स्कायमेंटने बांधला होता. मात्र नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा वेग हा मंदावला गेला असल्याने सध्या मान्सूनची वाटचाल अतिशय संथ गतीने सुरू आहे.
सहा दिवसांपूर्वी अरबी समुद्रात दाखल झालेला मान्सून श्रीलंकेत थोडा काळ खोळंबला आणि आता मान्सूनची वाटचाल पुढे सुरु झाली आहे. यामुळे लवकरच मान्सून केरळ गाठणार असून तेथून अवघ्या चार दिवसात मान्सून तळकोकण गाठणार. यामुळे मान्सून येण्यास थोडा उशीर जरी होत असला तरी देखील आगामी काही दिवसात मान्सून महाराष्ट्राची वेश गाठणार आहे.
यामुळे निश्चितच शेतकऱ्यांनी खरीपासाठी नियोजन करायला आतापासूनचं सुरवात केली आहे. हवामान विभागाच्या मते, मॉन्सूनच्या पुढील वाटचालीस पोषक हवामान असल्याने शनिवारपर्यंत म्हणजेच 28 मे पर्यंत दक्षिण अरबी समुद्र, मालदीव, लक्षद्वीप बेटे आणि कोमोरीन समुद्रात मॉन्सून दाखल होण्याची शक्यता आहे. याशिवाय महाराष्ट्र साठी महत्वाचा असलेल्या केरळमध्ये मान्सून आगमनाचेही भारतीय हवामान विभागाकडून निरीक्षण सुरू आहे.
Share your comments