1. हवामान

मेघराजा तू रुसला काय? पुन्हा तारीख बदलली, राज्यातील आगमन लांबलं

Maharashtra Monsoon Update : हवामान विभागाने यंदा वेळे आधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज दिला होता. (Meteorological Department) देशभरातील शेतकरी (Farmer) आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत.

Monsoon Update

Monsoon Update

Maharashtra Monsoon Update: हवामान विभागाने यंदा वेळे आधी मान्सून दाखल होणार असल्याचा अंदाज दिला होता. (Meteorological Department) देशभरातील शेतकरी (Farmer) आणि सर्वांनाच मान्सूनचे वेध लागले आहेत.

त्यामुळे शेतकरी सध्या आगामी खरिपाची तयारी सुरु करीत आहेत. मात्र आता पुन्हा एकदा मान्सूनची तारीख पुढे गेली आहे. वेळे आधी दाखल होणार मान्सून रेंगाळला असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. (Maharashtra Monsoon Update). मेघराजा तू रुसला काय? आता अशी म्हणण्याची वेळ आली आहे.

इकडं लक्ष द्या..! मान्सून बाबत हवामान खात म्हणतंय...

दरम्यान, काही दिवसांपासून मान्सून कर्नाटकातील कारवारमध्ये अडकला होता. त्यानंतर आता तो गोव्याच्या सीमेवर रेंगाळला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील आगमनासाठी आता नवा मुहुर्त देण्यात आला आहे.

मान्सून राज्यात आता तो 12 ते 13 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे. यापूर्वी तो 7 जूनपर्यंत दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं दिला होता. मान्सूनच्या या लंपडावामुळे शेतकरी मात्र चिंता वाढली आहे.

आता सगळ्या शेतकऱ्यांचे टेन्शन मिटणार!! आता बांध कोरला तर होणार 5 वर्षांची शिक्षा, ट्रॅक्टरही होणार जप्त

कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र या भागांत ढगाळ वातावरण कायम आहे. अधून मधून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडतो. तर दुसरीकडे विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. काही भागांत पुढील दोन-तीन दिवसांत मान्सूनपूर्व सरींचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे.

अंगाची लाहीलाही करणाऱ्या उकाड्यानं अगदी हैराण केलं आहे. अशातच सर्वचजण पावसाची चातकासारखी वाट पाहत आहेत. पण, राज्यात मात्र अद्यापही उष्णतेची लाट (Heat Wave) जाणवत आहे.

अंबानी, बच्चन, तेंडुलकर आणि अक्षयकुमार हे पुणे जिल्ह्यातील 'या' डेअरीचे दूध पितात..!

English Summary: Maharashtra Monsoon Update Meteorological Department Published on: 07 June 2022, 11:21 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters