भारतीय हवामान खात्याने (Indian Meteorological Department) वर्तवलेल्या अंदाजानुसार या वर्षी मान्सून (Monsoon 2022) वेळेत दाखल होणार असल्याचे सांगितले होते. विशेष म्हणजे मान्सूनचा (Monsoon Update) प्रवास देखील या वर्षी चांगला दणक्यात सुरु झाला होता. पण आता मान्सून अडकला आहे.
मान्सून अडकला
अरबी समुद्रात पोहोचलेला मान्सून (Monsoon) श्रीलंकेच्या वेशीवर अडकला झाला आहे. त्यामुळे भारतातील मान्सून दाखल होण्याचा अंदाज हुकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. केरळमध्ये 27 मे रोजी मान्सून येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. आता मात्र, हा अंदाज हुकण्याची शक्यता आहे. कारण गेल्या तीन दिवसापासून मान्सून श्रीलंकेच्या वेशीवरच आहे.
महाराष्ट्रातील मान्सूनची तारीख
मान्सून 21 मे रोजी अरबी समुद्रात दाखल झाला होता. नियोजित वेळेपेक्षा ६ दिवस आधीच मान्सूनचे वारे सक्रीय झाले होते. त्यामुळे 27 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये तर 5 जूनपर्यंत मान्सून कोकणात पोहोचण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला होता. बंगालच्या उपसागराबरोबरच सध्या अरबी समुद्रातूनही जमिनीकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहे.
7th Pay Commission: 7व्या वेतन आयोगानंतर 8वा वेतन आयोग येणार की नाही? जाणून घ्या अपडेट
भारतीय हवामान विभागाने (Indian Meteorological Department) महाराष्ट्रात 5 जूनपर्यंत मान्सून सुरू होऊ शकतो. 7 जुनच्या सुमारास तो राजधानी मुंबईत दाखल होणार आहे. म्हणजेचं मान्सून हा दोन दिवस उशिरा कोकणात दाखल होणार आहे. तर 12 जून ते 15 जून या कालावधीत संपूर्ण राज्यात मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
PM Kisan Samman Nidhi: 11 व्या हप्त्यासाठी, लाभार्थी यादीतील नाव "या" प्रमाणे तपासा
Share your comments