
Hurricane Asani: Hurricane route changed, what effect on MaharashtraHurricane Asani: Hurricane route changed, what effect on Maharashtra, where will rain fall?, where will rain fall?
बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने आसनी चक्रीवादळ निर्माण झाले आहे. चक्रीवादळाने आता आपला मार्ग बदलला असून ते आंध्र प्रदेशकडे सरकले आहे. हवामान खात्याने आंध्र प्रदेशातील तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केला आहे. दरम्यान, या चक्रीवादळाचा परिणाम महाराष्ट्राच्या काही भागात जाणवेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
असे हवामान खात्याने सांगितले की असनी चक्रीवादळ बुधवारी सकाळी काकीनाडा आणि विशाखापट्टणमच्या किनारी भागात धडकण्याची शक्यता आहे, या वेळी, जोरदार वारे १०० किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात, ज्यामुळे मुसळधार पाऊस पडतो. आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी, पश्चिम गोदावरी आणि यानाम या तीन जिल्ह्यांना रेड अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
चक्रीवादळ वेगाने आंध्र प्रदेशकडे सरकत आहे. या काळात मुसळधार ते अतिवृष्टी अपेक्षित आहे. ही स्थिती १२ मेपर्यंत कायम राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागावर असनी चक्रीवादळाचा प्रभाव जाणवण्याची शक्यता आहे. या भागात ढगाळ वातावरण असणार आहे. यासोबतच मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली या परिसरातही असनी चक्रीवादळाचा परिमाण जावण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
११ मे रोजी कोकण, मराठवडा तसेच मध्य महाराष्ट्रात तुरळकक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, विदर्भातही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता तर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली आहे. १२ मे रोजी कोकणात तुरळ कठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची तगर तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे शक्यता.
चक्रीवादळ गेल्या सहा तासांपासून १२ किमी प्रतितास वेगाने पुढे जात आहे. बुधवारी सकाळी उत्तर पश्चिम बंगालच्या उपसागरामार्गे मध्य पश्चिमेकडील आंध्रप्रदेश किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर वादळ लगेचच आपला मार्ग बदलले आणि मछलीपटनम, नरसापूर, यनम, काकनीडा, टूनी आणि विशाखापट्टनम किनारपट्टीच्या दिशेने धडकेल असे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
7th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांच्या DA आणि DR मध्ये होणार 'इतकी' वाढ
२० जूनला होणार संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान
Share your comments