महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये सध्या मुसळधार पाऊस सुरू असून कोकण व मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली आहे.या दरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
या दरम्यान या भागांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून संपूर्ण राज्यात सर्वदूर पाऊस पडणार असल्याचे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.
दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीलगत कमी दाबाचा पट्टा तयार झाला असून तो कार्यरत आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सगळीकडे पाऊस सुरू असून अनेक भागात मध्यम ते मुसळधार पाऊस पडत आहे.
नक्की वाचा:राज्यात पावसाचा धुमाकूळ, 30 धरणे भरली, शेतकऱ्यांची काळजी मिटली..
कोकणात अतिरुष्टी होत असून राज्याच्या इतर भागात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना 10 ते 11 जुलै पर्यंत रेड अलर्ट देण्यात आला असून या ठिकाणी अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
तसेच 12 ते 13 जुलै रोजी याच भागाला ऑरेंज अलर्ट दिला असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच येणारे पुढील दोन दिवस ठाणे,नाशिक, सिंधुदुर्ग, कोल्हापूर इत्यादी ठिकाणी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे.
त्यासोबतच मराठवाड्यातील औरंगाबाद,जालना तर विदर्भातील बुलढाणा,अकोला,अमरावती,वाशिम,भंडारा, गोंडिया या ठिकाणी येलो अलर्ट जारी करण्यात आला पासून मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
तसेच आज पासून ते 13 जुलैपर्यंत कोकणामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तसेच मध्य महाराष्ट्रात देखील काही भागात अतिवृष्टीचा इशारा आहे.
मराठवाड्यात मुसळधार व विदर्भात मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
नक्की वाचा:Rain Update: पुढील चार दिवस धोक्याचे; 'या' भागात रेड अलर्ट
Share your comments