सध्या राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली असून कोकण, मुंबई परिसरात जोरदार पाऊस होत आहे. राज्यात देखील बर्याच ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस बरसत आहे. त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
तसेच राज्याच्या बऱ्याच भागांमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाल्यामुळे पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पिकांची मोठे नुकसान झाले आहे.
परंतु काही ठिकाणी चांगला पाऊस होत असताना राज्यातील बऱ्याच भागांमध्ये अजूनही अपेक्षित पाऊस नाही. त्यामुळे अशा ठिकाणी अजूनही पेरण्याचा खोळंबा पाहायला मिळत आहे.
ज्या भागात पाऊस झाला तेथील पेरण्या आटोपल्या मात्र ज्या ठिकाणी पाऊस नाही त्या ठिकाणी अजूनही मोजक्याच पेरण्या झालेले आहेत.
नक्की वाचा:Rain Update: "काय तो पाऊस, काय ते पाणी, काय ते रस्ते"; मुंबई तुंबली...
त्यामुळे राज्यातील बरेच ठिकाणी अजूनही शेतकरी राजा पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात हवामान अंदाज साठी प्रसिद्ध असलेले पंजाबराव डख यांनी मान्सून अंदाज वर्तवला आहे तो आपण पाहू.
पंजाब रावांचा पावसाचा अंदाज
पंजाबराव यांनी 17 जुलैपर्यंत आपल्या मान्सूनचा अंदाज वर्तवला असून त्यांच्यामते आजपासून नऊ तारखेपर्यंत राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस पडणार असून त्यानंतर 12 जुलै पर्यंत काही काळ पावसाची उघडीप राहणार आहे.
त्यामुळे या उघडीपिच्या पुढच्या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे उरकून घ्यावीत असे देखील पंजाबराव यांनी सांगितले आहे.
बारा तारखे नंतर मात्र 13 ते 17 जुलै च्या दरम्यान राज्यात परत मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाचा पाऊस कोसळणार असून राज्यातील अनेक भागात या कालावधीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस होणार असल्याचे भाकीत पंजाबराव यांनी केले आहे.
तसेच याच कालावधीत मुंबई देखील अतिवृष्टी होणार असून मुंबईकरांना देखील सतर्कतेचा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच पूर्व विदर्भामध्ये सुद्धा अतिवृष्टी होणार असल्याचा पंजाबराव यांना अंदाज वर्तवला आहे. शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
नक्की वाचा:IMD Alert: राज्यातील 'या' भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊसाची शक्यता
Share your comments