जून महिना संपत आला तरी सुद्धा महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा खूपच कमी पाऊस पडला. अजूनही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्याचा खोळंबा झाला आहे. काही भागांमध्ये बरा पाऊस आहे तर काही भागांमध्ये अजूनही पावसाची प्रतीक्षा तशीच आहे.
जूनचा शेवटच्या आठवड्याची सुरुवात पावसाने झाली होती. मराठवाड्याच्या काही भागात तर कोकणामध्ये चांगला पाऊस झाला.
हा आठवडा सुरू होतानाच हवामान खात्याने येणाऱ्या पाच दिवस चांगला पाऊस होण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार आता राज्यातील काही भागात पाऊस सुरू झाला
असून या पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. जर आपण कोकण किनारपट्टीचा विचार केला तर त्या ठिकाणी मान्सूनचा जोर वाढण्यासाठी आवश्यक पोषक वातावरण आहे.
यातच आता हवामान खात्याने रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये आज पासून पुढचे दोन दिवस ऑरेंज अलर्ट दिला आहे. त्यासोबतच मुंबई आणि ठाण्यात देखील येणाऱ्या दोन दिवसात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:जून तर गेला कोरडा,जुलै ते सप्टेंबर महिन्यात कसा राहील पाऊस? वाचा हवामान खात्याचा अंदाज
तसेच पुढचे तीन ते चार दिवसात कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकण किनारपट्टीच्या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकणात चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असून उद्यापासून मुंबई आणि ठाण्याला येलो ॲलर्ट जारी करण्यात आला आहे.
त्यासोबतच पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सातारा या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या 24 तासात मुसळधार
पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला असून अहमदनगर, परभणी, हिंगोली नांदेड तसेच जालना या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
उर्वरित महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस रिमझिम ते तुरळक पाऊस असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Share your comments