हवामानाचा अंदाज शेतकऱ्यांना वेळेवर आणि अचूक मिळणे खूप गरजेचे आहे. कारण जर शेतकऱ्यांना आगाऊ हवामानाचा अचूक अंदाज मिळाला तर शेतकरी सावध होऊन शेतात करायचे आवश्यक गोष्टी पटकन शेतकऱ्यांना करता येतील व होणाऱ्या संभाव्य नुकसान पासून वाचता येईल.
परंतु बऱ्याचदा असे होते की,अचूक हवामानाचा अंदाज न मिळाल्याने शेतकरी गाफील राहतातअचानक आलेल्या पावसामुळे किंवा गारपिटीमुळे पिकांचे अतोनात नुकसान होते व शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो.याचे उदाहरण मागच्या वर्षी सगळ्यांना महाराष्ट्रभर पाहायला मिळाले.
एवढेच नाही तर अचूक हवामान अंदाजा मुळे शेतकऱ्यांना पिकांचे व्यवस्थापन करणे देखील सोपे जाते. परंतु बऱ्याचदा हवामानाचा अंदाज लवकर येतो परंतु पूर्णराज्याचा किंवा विभागाचा असतो.त्यामुळे स्थानिक पातळीवर बऱ्याचदा असा अंदाज चुकतो.
या सगळ्या समस्या वर उपाय म्हणून भारतीय हवामान विभाग शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवरआणि शेतकऱ्यांच्या स्थानिक भाषेत हवामान अंदाजाची माहिती मिळावी यासाठी जोरात तयारी करत असून लवकर शेतकऱ्यांना त्यांच्या गाव पातळीवरील हवामानाची माहिती त्यांच्या भाषेत मिळू शकेल अशा पद्धतीची तयारी करीत आहे.
विशेष म्हणजे ही सेवा पूर्णपणे मोफत असून यासाठी शेतकऱ्यांना फक्त एका फोन नंबर वर कॉल करावा लागेल.परंतु कुठलाही नंबर जारी करण्यात आला नसून लवकरच क्रमांक जारी करण्यात येणार असून हा नंबर फक्त हवामान अंदाजाच्या माहितीसाठी असेल.
शेतकऱ्यांनी फक्त हा नंबर डायल केला की लगेच त्यांना त्यांच्या स्थानिक भाषेत त्यांच्या गाव पातळीवरील हवामान अंदाजाची माहिती पटकन मिळेल. त्यामुळे या सुविधेचा फायदा शेतकऱ्यांना होणार असून संभाव्य पिकांच्या नुकसानीपासून ते वाचू शकतात.
मेघदूत ॲप द्वारे अगोदरच तीन कोटी शेतकऱ्यांना हवामान विषयक माहिती जारी करण्यात आली आहे
सध्या भारतीय हवामान विभाग, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था आणि भारतीय कृषी संशोधन परिषद अर्थात आयसीएआर यांच्या संयुक्त उपक्रमाच्या माध्यमातून मेघदूत नावाच्या मोबाईल ॲप शेतकऱ्यांना जिल्हास्तरीय हवामानाची माहिती पुरवते.
एवढेच नाही तर हे अँप हवामाना सोबतच शेतातील पिके आणि पशुधनाचे देखील माहिती इंग्रजी आणि स्थानिक भाषांमध्ये दिली जाते. परंतु आता ही सुविधा लवकर आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या गावच्या स्थानिक भाषेमध्ये आणि गावाचाच हवामान अंदाज लवकर करणार असल्यामुळे होणाऱ्या संभाव्य नुकसानीपासून शेतकरी वाचणार आहेत.
नक्की वाचा:चक्रभुंगा व्यवस्थापनासाठी फक्त एव्हढ करा आणि चक्रीभुंग्या पासून सोयाबीन ला सुटका मिळवा
Share your comments