1. हवामान

चिंताजनक : महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Atmosphere) बदल होत आहे. शेतऱ्यांसमोरील संकटे काही कमी व्ह्यायचे नाव घेत नाहीत. आता हवामान विभागाने राज्यालातील काही भागात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे.

महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता

महाराष्ट्रात दोन दिवस गारपिटीची शक्यता

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील वातावरणात (Atmosphere) बदल होत आहे. शेतऱ्यांसमोरील संकटे काही कमी व्ह्यायचे नाव घेत नाहीत. आता हवामान विभागाने राज्यालातील काही भागात यलो अलर्ट (Yellow alert) जारी केला आहे. आज आणि उद्या कोकण आणि मराठवाड्यात (Konkan Marathwada) पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

दोन दिवस गारपिटीची शक्यता

पश्चिम महाराष्ट्रात गारपीट आणि पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा आणि सांगली, कोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे जोरदार वादळ, मेघगर्जनेसह गारपीट होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. (Kolhapur, Satara, Sangli, Ratnagiri Sindhudurg)

Skymet : वेधशाळेचा अंदाज आला रे; महाराष्ट्रात असा असणार मान्सून...

मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाची शक्यता आहे. येत्या दोन दिवसांत 13 ते 14 एप्रिल दरम्यान या भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे.

फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

प्रामुख्याने फळबागांना मोठा फटका बसला आहे. आंबा आणि द्राक्ष (Mango Grapes) बागांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. काही ठिकाणी जोरदार वारा आणि पावसामुळे घरांची पडझड देखील झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या :
Weather Update : मेघराजा यंदाही चांगलाच बरसणार...
कांदा दराचा प्रश्न मिटणार; कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने ठरवली रणनिती

English Summary: Chance of hail for two days in Maharashtra Published on: 13 April 2022, 11:54 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters