सध्या उष्णतेने सगळ्यांना हैराण केले आहे. असह्य असा उकाडा जाणवत असल्याने अंगाची लाही लाही होत आहे. उष्णतेच्या लाटा एकामागून येत असून आतापर्यंत कधी नव्हे एवढा उकाडा यावर्षी जाणवत आहे.
महाराष्ट्रात नाही तर जम्मू काश्मीर पासून विचार केला तर मध्य प्रदेश तसं उत्तर पश्चिम भारतात उष्णतेचे प्रमाण प्रचंड आहे. अशात एक तापदायक बातमी समोर येत आहे ती म्हणजे मध्य महाराष्ट्र ते विदर्भा पर्यंत येणाऱ्या आठवड्यात उष्णतेची आणखी एक लाट येण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. मुंबई ठाण्यासह राज्यातील शहरी भागातील पारा अचानक उसळी मारत असल्याचे नमूद होत आहे.
भारताची स्थिती
उत्तर पश्चिमेकडील राजस्थान, पंजाब, दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, चंडीगड तसेच हिमालयीन विभागासह पश्चिम भागातील गुजरात मध्यप्रदेशापर्यंत गेल्या दीड ते दोन महिन्यांच्या कालावधीत निरभ्र आकाश आणि कोरड्या हवामानामुळे उष्णतेच्या तीव्र लाटा आल्या. उत्तरेकडून दक्षिणेकडे सातत्याने कोरडे आणि उष्ण वारे वाहत असल्याने महाराष्ट्रात देखील उष्णतेच्या लाटा सातत्याने आल्या.
मुंबई सोबतच कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात देखील एकापाठोपाठ उष्णतेच्या लाटांची स्थिती आली. एप्रिल महिन्याची सुरूवातच आठ दहा वर्षात नवे एवढ्या उच्चांकी तापमानाची राहीली. यामध्ये मुंबई, पुणे, अहमदनगर, सोलापूर, जळगाव, नाशिक आणि मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी आणि विदर्भात जवळपास सर्वच ठिकाणी पारा उच्चांकी पातळीवर होता. आता एप्रिल महिन्याचा शेवटच्या टप्प्यात देखील विदर्भ आणि मराठवाड्यातील तापमान चाळीस अंशांच्या पुढेच आहे. शनिवारचा विचार केला तर जळगाव मध्ये राज्यातील उच्च अशा 44 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
येणाऱ्या आठवड्यात उष्णतेची लाट
जर आपण मार्च महिन्यापासून विचार केला तर राज्यामध्ये चार ते पाच उष्णतेच्या लाटा आल्या. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात सर्वाधिक उष्णतेच्या लाटा आल्या.
सध्या दक्षिण पासून उत्तरे पर्यंत विविध राज्यात पावसाळी वातावरण आहे. ते दोन ते तीन दिवसात निवळेल. त्यानंतर महाराष्ट्रात मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात उष्णतेची लाट याची दाट शक्यता आहे. यामध्ये जळगाव, अहमदनगर, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश असून या जिल्ह्याच्या शेजारील भागात देखील तापमानात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
Share your comments