अनेकजण गाई म्हैस पाळतात तसेच इतर पाळीव प्राणी देखील पाळतात मात्र शक्यतो काहीच ठिकाणी ससा पाळला जातो. मात्र कोकणातील एका तरुणानं इंजिनीअरची (Engineer) नोकरी सोडून ससे पालनाचा व्यवसाय (Rbbit farming) सुरु केला आहे. यामध्ये तो चांगले पैसे देखील कमवत आहे. यामुळे हा एक चांगला व्यवसाय आपल्यापुढे आहे.
या तरुणाने हा व्यवसाय नेमका कसा सुरु केला? सशांचे संगोपन कसं केलं जातं? याबाबत देखील विशेष काही गोष्टी लागत नाहीत, यामध्ये मोठ्या प्रमाणावर पैसे देखील गुंतवावे लागत नाहीत. निलेश गोसावी असे या तरुणाचे नाव आहे. त्यांच्याकडे 6 प्रजातीचे 200 पेक्षा जास्त ससे आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील निरुखे हे त्यांचे गाव आहे.
निलेश यांनी हरियाणामध्ये जाऊन यासाठी ट्रेनिंग घेतले आहे. व्यवसायासाठी त्यांना 3 लाख 50 हजार रुपये लागले होते. शेड उभारण्यासाठी 2 लाख 50 हजार असे एकूण 6 लाखात त्यांनी हा व्यवसाय सुरु केला आहे. त्यासाठी ससे सुध्दा हरियाणामधून आणले आहेत. त्यांच्याजवळ एकूण 6 प्रजातीचे ससे आहेत. त्यांना मुंबईत नोकरी लागली होती मात्र ती नोकरी सोडून निलेश गोसावी यांनी कोरोना काळात घरी येऊन ससे पालनाचा व्यवसाय सुरु केला.
पीक विम्याची 75 टक्के रक्कम वाटपास सुरू, शेतकऱ्यांना मोठा दिलासा
सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग जवळील गोव्यात मोठी मागणी आहे. याचे पांढर मटण असतं. यामध्ये प्रोटीन आणि विटामिन खूप आहेत. त्यामुळं आरोग्याच्या दृष्टीनं ते महत्वाचे मानले जाते. यामुळे याला चांगली मागणी असते. सशांचा उपयोग हा घरी पाळण्यासाठी, खाण्यासाठी आणि प्रयोगशाळेत केला जातो. सशाच्या मटणाला सिंधुदुर्ग, गोव्यात मोठी मागणी आहे.
ससे पाळण्यासाठी ते 450 रुपयाला सशाची विक्री करतात. तर सशाचं मटण 600 रुपये किलोने विकतात. त्यामुळं त्यांना महिन्याकाठी 80 ते 90 हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. यामुळे त्यांनी हा आगळा वेगळा आणि चांगला व्यवसाय निवडला आहे. ससे पालनासाठी 5 से. ते 35 से. तापमान त्यांना आवश्यक असतं. ते कोकणात आहे.
या 3 स्वस्त इलेक्ट्रिक कार्स लवकरच भारतात लॉन्च होणार, बजेट कमी असले तरी टेन्शन नाही...
तसेच खाद्य म्हणून गहू, मका, सोयाबीन यांचा भरड, कोबी आणि फ्लॉवरची पान हा चारा सशांचे खाद्य आहे. ससाची विष्टा ही ऑरगॅनिक खत म्हणून वापरु शकतो. याला देखील मोठी मागणी असते. तसेच सशाचं मूत्र मिरजमधील द्राक्ष बागायदार घेऊन जातात. हे मूत्र कीटकनाशक म्हणून वापरतात. मूत्र 10 रुपये लिटर तर पेंडी 20 रुपये किलो ने विकत असल्याचे निलेश गोसावी यांनी सांगितले.
त्यामुळं ससे पालन हा कोकणात एक उदयोन्मुख उद्योग असल्याचे निलेश यांनी सांगितले. यामुळे तरुणांसाठी हा एक चांगला व्यवसाय आहे. आज आंतरराष्ट्रीय ससा दिवस जगभरात साजरा केला जातोय. दरवर्षी दरवर्षी सप्टेंबर महिन्याच्या चौथ्या शनिवारी आंतरराष्ट्रीय ससा दिवस साजरा केला जातो.
महत्वाच्या बातम्या;
'स्वाभिमानी'ची ऊस परिषद 15 ऑक्टोबरला, 'एफआरपी' साठी आंदोलन पेटणार..
शेतकरी संप चिघळला, शेतकऱ्यांनी रस्त्यावर फेकले कांदे, बटाटे
Lumpy: दूध तुटवडा असल्याची अफवा पसरवल्यास कारवाई होणार, दर वाढण्याची शक्यता..
Share your comments