मराठवाडा, विदर्भ लातूर आणि नंदुरबार म्हटलं की आपल्या समोर येतो ते म्हणजे दुष्काळ, कमी पाणी आणि तापमान. तसेच पाऊस पाणी नसल्यामुळे आणि सदैव पडलेल्या दुष्काळामुळे या भागातील शेतकरी कर्जबाजारी बनले आहेत. सध्या विदर्भातील शेतकरी आता शेती मध्ये वेगवेगळे प्रयोग करून शेतीमधून भरघोस उत्पादन मिळवत आहेत. वाशीम जिल्ह्यातील एका युवकाने चक्क नोकरी च्या मागे न लागता शेती करण्याचे ठरवले आहे. वडिलोपार्जित मिळालेल्या शेतजमिनीत संत्र्याची लागवड करून बक्कळ पैसे कमवत आहे.
पारंपरिक पद्धतीने संत्राची लागवड :
वाशीम जिल्ह्यातील अडोळी गावात राहण्याच्या विलास इढोळे या तरुणाने नोकरी च्या मागे न पळता चक्क शेती करण्याचे ठरवले आहे. वडिलोपार्जित मिळालेल्या 7 एकर पैकी 3 एकर शेतीमध्ये विलास ने संत्राची लागवड केली. विलास ने संत्राची लागवड करून 8 वर्ष झाले. पारंपरिक पद्धतीने संत्राची लागवड करून विलास दर वर्षाला संत्रे विकून 4 लाख रुपये सुद्धा कमवत आहे. परंतु आता च्या काळात ते उत्पादन 9 लाखांवर पोहचले आहे. विलास इढोळे यांचा मुलगा वैभव याने सुदधा शेती व्यवसाय करण्याचे ठरवून शेतामध्ये कष्ट करण्याची ठरवले.सुरवातीस वैभव हा पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होता परंतु कोरोंना आल्यामुळे संपूर्ण जगभर लॉक डाउन ची घोषणा करण्यात आली.
गावाला आल्यावर वैभव ने आपल्या वडिलांना शेतीच्या कामात मदत करायला सुरुवात केली आणि आपल्या ज्ञानाचा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून वैभवने शेतीमध्ये बदल करण्यास सुरुवात केली.अनेक कठोर परिश्रम आणि कष्ट करण्याची तयारी यामुळे संत्राचे वार्षिक उत्पन्न तब्बल 50 टक्यांनी वाढले. तसेच येत्या 2 ते 3 वर्ष्यात संत्राचे वार्षिक उत्पन्न 15 लाख रुपयांपर्यंत घेऊ असे सुद्धा वैभव ने इतरांना सांगितले आहे.पैसे मिळायला लागल्यावर वैभव ने नोकरीचा नाद सोडून दिला आणि संत्र्याच्या शेतीमधून बक्कळ पैसे कमवू लागला. नोकरीपेक्षा जास्त उत्पादन वैभव ला मिळू लागले. वाशीम जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी फळबागांची लागवड करावी यासाठी कृषी विभाग सुद्धा प्रयत्न करत आहेत.
सुरुवातीला वाशिम जिल्ह्यात फळबागांचे क्षेत्र हे 4 हजार 200 हेक्टर होते परंतु तेच क्षेत्र आता 8 हजार 300 हेक्टर वर येऊन थांबले आहे. त्यापैकी संत्रा शेतीचे क्षेत्र हे 6 हजार 200 हेक्टर आहे. नवनवीन तंत्रज्ञान विकसित करून शेतीमधून बक्कळ उत्पन्न मिळत आहेत.शेती हा घाटयाची म्हणून ओळखले जाते. जास्त कष्ट करून सुद्धा उत्पन्न मिळत नसल्याने शेतकरी अस्वस्थ राहत असतो. तसेच शेतीमध्ये योग्य नियोजन अथवा खत व्यवस्थापन करून आणि पाणी पुरवठा करून तसेच तंत्रज्ञान विकसित करून बक्कळ नफा मिळवू शकतो.
Share your comments