शहरी धावती जीवनशैली आणि मानवी आरोग्य यात आहार व्यवस्थापनास महत्व आहे यासाठी आहारात हिरव्या पालेभाज्या यांचा समावेश असणे जरुरीचे आहे हीच गरज जाणून आज शहरातील इमारतींंच्या गच्चीवर भाजीपाला शेती केली जात आहे आणि हि संकल्पना टेरेस गार्डन म्हणून समोर येते आहे. जगातील अद्यावत कृषी तंत्रज्ञानाने शेती करणारा देश इस्राईल शहरातील लोकसंख्येसाठी ताजा भाजीपाला मिळावा यासाठी टेरेस गार्डन हि संकल्पना राबवत आहे विशेषकरून शहरातील मॉलच्या गच्चीवर याच प्रायोगिक प्रारूप उभा केले जाते आहे व या गार्डनच्या माध्यमातून ग्राहकांस आरोग्यदायी व स्वादिष्ट भाजीपाला पुरविण्याच काम केल जात आहे.
६५० चौरस मीटर मध्ये डिझेंंगाॅफ सेंटर हे इस्राईल मधील पहिले शॉपिंग मॉल आहे, आणि या मॉलच्या टेरेसवरती भाजीपाला फुलविण्याच काम सुरु आहे. तेल अवीव या शहरच्या इतिहासात या वास्तूचे अनन्यसाधारण असे महत्व आहे आणि हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती अस आहे.
ग्रीन इन द सिटीमध्ये सेंद्रिय हे अत्युत्तमतेच मानक आहे १५ हून अधिक प्रकारच्या पालेभाज्या रसायनमुक्त पद्धतीने उत्पादित केल्या जातात. या उपक्रमात शॉपिंग मॉलच्या गच्चीवर भाजीपाला शेती करताना सुरवातीला हि प्रायोगिकरित्या करण्यात आली या प्रयोगात त्यांना हिरव्यागार भाज्या आणि त्यांचे स्वरूप, अर्थार्जन पाहता व्यावसायिकतेकडे वळावे असे वाटले त्यानंतर टेरेस गार्डनच्या माध्यमातून व्यावसयिक दृष्टीकोन ठेवून भाजीपाला पिकवला जाऊ लागला. ग्रीन इन द सिटी या उपक्रमात दोन फार्म आहेत यात एक भाजीपाला उत्पादन आणि या मातीविना शेतीच (हायड्रोपोनिक्स) लघुस्तरावरील प्रारूप याच कौशल्य प्रदान करण्याच काम करते आहे, आहारातील हिरव्या पालेभाज्यांचा वाढता वापर पाहता यात बॅसेल, मॅनगोल्ड, पार्सली, मिंट, सेलेरी, ग्रीन ओनियन अरुगुला इत्यादी विदेशी भाज्यांचा समावेश आहे.
टेरेस वरील भाजीपाला शेती हे कार्य अतिसूक्ष्म आहे आणि ते प्रायोगिक स्तरावर सुरु आहे, शहारातील मोक्याच्या ठिकाणी हिरव्या पालेभाज्यांची शेती टेरेस गार्डनच्या माध्यमातून कशी करता येईल यासाठी प्रयत्न टेरेस वापराकरिता नियम आणि काही कर व इतर प्रश्न यांचा सामना करून तेल अवीव मधील हे मॉडेल इतर भागातही कसे उभारता येईल याकडे लक्ष देणे जरुरीचे आहे. या उपक्रमातून शहरातील हॉटेलला सेंद्रिय, रसायनमुक्त ताज्या भाज्या कशा देता येतील याकडे विशेष लक्ष दिले जाते, विशेषत: तेल अवीव मधील ग्राहक वर्ग निरोगी आहार पद्धती बद्दल अत्यंत जागरूक आहे, वर्तमानपत्र व इतर माध्यमांच्या मुळे कीडनाशकांचा मानवी आरोग्यावर परिणाम व रसायनमुक्त अन्नाचे महत्व याबद्दल त्यांच्यात जागरूकता आहे व यामुळे सुरक्षित अन्न खरेदीला प्राधान्य दिले जाते आहे.
डिझेंंगाॅफ सेंटरच्या इतर उपक्रमामध्ये आठवडी अन्न मेळ्याच्या माध्यमातून लघुव्यवसायांचा प्रसार व अशासकीय संस्थाना सहाय्य केले जाते आहे, वाढती लोकसंख्या हवेचे प्रदूषण यावर शहरी शेती उत्तम उपाय ठरू शकतो आणि यासाठी डिझेंंगाॅफ सेंटर ग्रीन इन द सिटी या उपक्रमातून पुढाकार घेताना दिसते आहे.
Share your comments