काळाच्या ओघात शेतकरी आपल्या शेतीमध्ये बदल करत आहेत तसेच जे नवीन युवक शेती व्यवसायात उतरले आहेत ते सुद्धा शेतात नव्याने प्रयोग करत आहेत. मिश्र शेती कशा प्रकारे करायची तसेच याचे फायदे काय आहेत ते आपणास फक्त मार्गदर्शन कार्यक्रमात ऐकायला मिळते पण नांदेड मधील हानेगाव येथील रवींद्र धुळे या शेतकऱ्याने करून दाखवले आहे. रविंद्र ने आपल्या ५ एकर जमिनीवर ९ पिकांचे उत्पादन घेतले आहे. हा प्रयोग करण्यापूर्वी रवींद्र ने लागवडीपासून ते काढणीपर्यंत सर्व नियोजन करून ठेवले होते. या प्रयोगातून रविंद्र ला २ लाख रुपयांचे उत्पन्न भेटले आहे असे त्याने दावा केला आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे नुकसान झाले आहे पण रवींद्र1चा हा प्रयोग बघण्यास खूप गर्दी झालेली आहे.
5 एकरामध्ये 9 पिके बहरली :-
रवींद्र घुळे याने आपल्या ९ एकर शेतजमिनीवर ५ पिके घेतलेली आहेत जे की यामध्ये शेवगा, सीताफळ, लिंबू, झेंडू तर जे उर्वरित क्षेत्र आहे त्यावर भाजीपाल्याची लागवड केली आहे. रवींद्र याव्यतिरिक्त रब्बी तसेच खरीप हंगामातील एकाही पिकाला शेतीमध्ये स्थान दिलेले नाही. डोळ्यासमोर फक्त उत्पादन दृष्टी ठेवून त्याने आपल्या शेतात हा प्रयोग केला आहे. सध्या या सर्व पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले असल्यामुळे पिके जोमात बहरत आहेत.
अशी आहे सिचंनाची सोय :-
पाण्याची मुबलकता यंदा चांगल्या प्रकारे आहे तरी सुद्धा घुळे यांनी ठिबक सिंचनाचा वापर केला आहे जे की ठिबकच्या माध्यमातून पिकांना पाणी दिले जात आहे. मिश्र शेती करण्याआधी घुळे यांनी व्यवस्थित प्रकारे योग्य नियोजन केले होते जे की पाणीपुरवठा योग्य वेळेत करणे त्यांनी मांडले होते. या पिकांमध्ये आंतरपिक म्हणून त्यांनी भाजीपाला लागवड सुद्धा केलेली आहे. घुळे सांगतात की फक्त कष्ट करून उत्पन्नात वाढ होत नाही यर त्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेची सुद्धा जोड देणे गरजेचे आहे. ५ एकर पूर्ण क्षेत्राला पाणी कसे मिळेल याची खट्ट नियोजन घुळे यांनी केले आहे.
शेवग्याला हमीभाव, दोन लाखाचे उत्पन्न अपेक्षित :-
मिश्र शेती केल्याने कमीत कमी २ पिकांना तरी चांगला दर मिळतो जे की हा प्रकार घुळे यांच्या बाबतीत सुद्धा घडलेला आज. सध्या बाजारात शेवग्याच्या शेंगेला प्रति किलो १२० रुपये ने दर भेटत आहे तर फुलांना सुद्धा चांगला दर भेटत आहे. मिश्र शेती केल्याने जमिनीचा पोत सुद्धा चांगल्या प्रकारे सुधारतो. हा अनोखा प्रयोग पाहण्यासाठी माणसांची झुंबड उठलेली आहे.
Share your comments