1. यशकथा

तुम्हाला माहिती आहे का ट्रॉली सोलर सिस्टम काय आहे? काय होतो शेतकऱ्यांना याचा फायदा?

trolly solar pump

trolly solar pump

आपल्याकडे म्हणतात की जर काही करण्याची इच्छा असेल तर कुठलेही काम अशक्य नाही. व्यक्तीमध्ये असलेली इच्छा त्याला पुढे नेते. या लेखामध्ये आपण अशाच एका अवलिया शेतकऱ्यांच्या बाबतीत माहिती घेणार आहोत.जेवर्तमान मध्येयशाच्या शिखरावर आहेत.

 

जाणून घेऊ या बद्दल

 हरियाणा मध्ये राहणाऱ्या प्रदीप कुमार यांनी एकवेगळ्या प्रकारचे सोलर पॅनल बनवले आहे.ज्या शेतकऱ्यांना शेतीसाठी फारसा उपयुक्त सिद्ध होत आहे. प्रदीप कुमार हरियाणा राज्यातील हीसार जिल्ह्यातील पेटवाड गावाचे रहिवासी आहेत.जे शेतकरी आहेत.ज्यांनी एका वेगळ्या प्रकारच्या सोलर पंपाचीपद्धत विकसित केली आहे.जी शेतीच्या कामामध्ये फारच फायदेशीर आहे.प्रदीप कुमार यांनी ट्रॉली सोलर पंप चा प्लांटविकसित केला आहे. जे शेतीच्या कामांना सोबतच इतर कामांमध्ये देखील उपयोगी आहे.

 ट्रॉली सोलर पंपाचे वैशिष्ट्ये

1-हा ट्रॉली सोलरपंपाचे महत्वाचे वैशिष्ट्य आहे की हा पंपा कोणत्याही ठिकाणी सहजतेने लावला जाऊ शकतो.

2- शेतकरी या सोलर पंपाला सहजतेने घरी नेऊ शकतात तसेच सहजतेने शेतात देखील नेऊ शकता.

3-या ट्रॉली सोलर पंप आला डिझेल किंवा विजेची आवश्यकता नाही.

4-जेव्हाशेतात गरज नसेल  तेव्हा घरी सौरऊर्जेपासून वीज तयार केली जाते.

5- घराशिवाय जिकडे आवश्यकता असेल तिकडे याचा प्रयोग केला जाऊ शकतो.

6-शेतकरी याला भाड्याने देऊ देखील चांगला नफा कमवू शकतात.

 

 प्रदीप यांच्या बद्दल थोडेसे

प्रदीप कुमार हरियाणा मधील एका छोट्या गावातील आहेत.प्रदीप कुमार यांचे म्हणणे आहे की त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शेतीमध्ये आवड असल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. वर्ष 2009 मध्ये सरकारी शाळेतील लॅब सप्लाय चे मटेरियल चे काम सुरू केले. याबाबतीत यांनी सांगितले की  लॅब सप्लाय चे काम फारच आव्हानात्मक असते.परंतु त्यांच्या मनामध्ये काहीतरी नवीन करण्याचा विचार सदैव चालू होता.या विचारांमधून त्यांनी ट्रॉली सोलर पंप प्लांट वर हळूहळू काम करणे सुरू केले.प्रदीप यांनी  ठरवले की सोलर च्या क्षेत्रांमध्ये काही करून पुढे जायचे. कारण त्यांना समजले होते की येणारा काळात सोलर ऊर्जेशिवाय पर्याय नाही. आणि हळूहळू त्यांनी या क्षेत्रावर पकड बनवली. त्यानंतर त्यांनी सोलर पॅनल प्लांट चे काम सुरू केले.चालू काळात तेट्रॉली सोलर प्लांटवर काम करीत आहेत.

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters