गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोला चांगला दर मिळत आहेत. यामुळे टोमॅटो उत्पादक शेतकरी आनंदात आहेत. राज्यात उसाचे प्रमुख पीक असताना उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील शिराढोणच्या शेतकऱ्याने टोमॅटोच्या शेतीतुन चांगले उत्पन्न मिळवले आहेत. या शेतकऱ्याने पारंपरिक शेतीला त्यांनी कधीच फाटा दिलाय तर बाजारपेठेचा अभ्यास करुन शेतीचे नियोजन हा त्यांच्या यशामागचे गमक आहे. वर्षभरात दोन वेळेस लागवड करुन त्यांनी ही किमया साधली आहे.
सुभाष आणि शरद माकोडे या बंधूची हे करून दाखवले आहे. वर्षभरात दोन वेळा 12 एकरामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली आणि यामधून चक्क 2 कोटी 50 लाखाचे उत्पन्न घेतले आहे. यामुळे त्यांची चर्चा सुरु आहे. गेल्या 7 वर्षापासून त्यांनी हंगामी पिके आणि भाजीपाल्यावर भर दिला आहे. 12 एकरातील शेतीमधून टोमॅटो, कारले, टरबूज यामधूनच ते अधिकचे उत्पादन घेत आहेत. यंदा तर टोमॅटोचे जसे बाजारपेठेत दर वाढत होते त्याच्या कैतपटीने माकोडे यांच्या शेतामधील टोमॅटोचे उत्पादन वाढत होते. यामुळे त्यांचे नशीबच बदलले आहे.
त्यांनी 12 एकरावर टोमॅटोची लागवड केली होती. नोव्हेंबर ते डिसेंबरच्या कालावधीत त्यांना यामधून 1 कोटीचे उत्पन्न मिळाले. त्यांनी पुन्हा 12 एकरावर टोमॅटोचीच लागवड केली होती. मार्चमध्ये लागवड केलेले टोमॅटोची आता बाजारपेठेत आवक सुरु असून दुसऱ्या प्लॉटमधून त्यांना दीड कोटी रुपये मिळाले आहेत. गेल्या 7 वर्षापासून हा भाजीपाला आणि हंगामी पिकांचा प्रयोग असल्याने यामधील चांगल्या-वाईट बाजू निदर्शनास आल्या आहेत. यातून त्यांनी अभ्यास करून नियोजन केले आहे.
आता लाल मुंग्याची काळजी करू नका! 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर
त्यांनी सलग दोनवेळा टोमॅटो लागवडीचे धाडस केले आणि यामधून कोट्यावधींचे उत्पादन पदरी पडल्याचे सुभाष माकोडे यांनी सांगितले आहे. बाजारपेठेचा अंदाज घेऊनच पिकाची निवड केली जाते. त्यामुळे नुकसान तर टळते पण अधिकचे उत्पादनही मिळते, असेही ते म्हणाले. यामुळे इतर शेतकऱ्यांनी देखील असाच अभ्यास करून शेती करणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या;
'ज्यांना सहकारी कारखाना काढता आला नाही त्यांनी खाजगी कारखाने काढले, त्यातील मी पण एक होतो'
आता पंजाबरावांनी जुलै महिन्यांचा अंदाज केला जाहीर, वाचा कधी पडणार नेमका पाऊस
मोदींचे २ हजार मिळाले नसतील तर थेट 'या' नंबरवर फोन करून करा चौकशी, लगेच मिळतील पैसे...
Share your comments