शेती क्षेत्र म्हटले म्हणजे अनेक प्रकारच्या चांगल्या संधी उपलब्ध आहेत.फक्त कष्ट आणिजिद्द या दोन गोष्टी राहिल्या म्हणजे यश जास्त दूर नसते. बदलत्या काळानुसार शेतकरी सुद्धा नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे सोपे बनवित आहेत व अशा तंत्रज्ञानाच्या मदतीने जास्तीत जास्त उत्पादन घेऊन चांगल्या प्रकारचे उत्पन्न मिळवीत आहेत.या लेखात आपण बिहार मधील गया जिल्ह्यातीलएकायशस्वीशेतकऱ्याचीयशोगाथापाहणारआहोत.
बिहारमधील गया जिल्ह्यातील शेतकरीराजेश सिंह यांनी गव्हाचा भुसा आणि एअर कंडिशनर यांचा वापर करूनस्वतःच्या घरामध्ये मशरूम ची शेती सुरू केली. त्यांनी नवीनपद्धतींचा वापर करून ना केवळ आपला स्वतःचा विकास केला तर त्यासोबतच त्यांच्या परिसरातील इतर शेतकऱ्यांना सुद्धायशस्वी होण्याचा रस्ता दाखविला.त्यामुळे त्यांच्या परिसरातील बरेच शेतकरी आता मशरूम शेती नियमितपणे करीत आहे.
पूर्ण वर्षभर चालते मशरूम उत्पादन
राजेश सिंह यांनी गव्हाचा भुसा आणि एयर कंडीशनर यांचा उपयोग मशरूम शेती साठीकेला आहे.तसे पाहायला गेले तर थंड वातावरणात मशरूम चांगले येते.परंतु राजेश सिंह यांनी एअर कंडिशनरचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवून घरामध्ये एक युनिट स्थापन केला आहे.त्या द्वारे पूर्ण वर्षभर मशरूम उत्पादन घेता येते.
न्यूज एजन्सी ए एन आय सोबत बोलताना राजेश सिंह यांनी म्हटले की या एअर कंडिशनरचा वापर करून मशरूम शेती सुरू केली कारण शेतकऱ्यांना नियमितपणेमशरूमचे उत्पादन घेऊन चांगले उत्पन्न मिळवता येऊ शकेल.कारण शेतीमधून नियमितपणे उत्पन्न मिळत नाही.एकदा शेतात पिकलेली उत्पन्न विकले की नंतर दुसऱ्या हंगामापर्यंतत्याच्याकडे दुसरा उत्पन्नाचा स्त्रोत नसतो. परंतु राजेश सिंह यांच्या तंत्रज्ञानाने त्यांच्या परिसरातील बरेच शेतकरी मशरूम उत्पादन घेत आहेतआणि चांगल्या प्रकारचा नफा मिळवीत आहेत.
राजेश सिंह यांनी म्हटले की मी एक शेतकरी परिवारा मधून येतो.पंधरा वर्षे नोकरी केल्यानंतरअसा विचार केला की स्वतःसाठी काही करण्याबरोबरच इतरांसाठी काही रोजगाराच्या संधी निर्माण करता येतील का? व त्या दृष्टिकोनातून 2016 यावर्ष मशरूम उत्पादनाचा व्यवसाय सुरू केला.पुढे बोलताना त्यांनी म्हटले की,सुरुवातीला ते फक्तखाद्य बनवीत होते परंतु 2020पासून त्यांनी स्वतःचे उत्पादन सुरू केले आणि प्रतिदिनदोनशे ते तीनशे किलो ग्रॅम मशरूमचे उत्पादन घेत आहेत.
पुढे बोलताना त्यांच्या भविष्यकालीन योजना विषयी त्यांनी सांगितले की,मशरूम हे एक पोषण तत्वांचा चांगला स्रोत आहे. त्यामध्ये बऱ्याच प्रकारचे विटामिन्स आणि खनिजे असतात. तसेच ते पर्यावरण आणि आरोग्यासाठी सुरक्षित आहे.ते त्यांच्या परिसरातील महिलांबरोबरच शेतकऱ्यांना सुद्धा हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत करीत आहेत व त्या बाबतीतली प्रशिक्षण देखील देत आहे. हा व्यवसाय छोट्या जागेवर सुरू करता येऊ शकतो तसेच त्यासाठी लागणारा कच्चामाल म्हणजे गव्हाचा भुस्सा हा शेतकऱ्यांकडे सहज उपलब्ध होतो.. तसेच हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकार 50 टक्के सबसिडी देते. मशरूम ला स्थानिक तसेच देशभरात चांगली मागणी आहे.
Share your comments