गाय आणि म्हशी शिवाय दुधाचे उत्पादन जर ऐकायला विचित्र वाटते ना?परंतु हे खरे आहे.कर्नाटक मधील एका तरुणाने स्टार्टअप च्या माध्यमातून हे काम करतोय. याबद्दल सविस्तर वृत्त असे की, कर्नाटक राज्यात राहणारे सुमैर सचदेव असे या तरुण उद्योजकाचे नाव आहे.
सुमेर यांनी आपल्या मित्रांच्या मदतीने प्लांट बेस्ड मिल्क प्रॉडक्ट चा स्टार्टअप लॉन्च केला आहे. यामध्ये ते ओट पासून दूध बनवतात. इतकेच नाही तर या दुधाचे मार्केटिंग ते संपूर्ण देशभर करत आहेत. प्रमुख शहरांमध्ये जसे की मुंबई, पुणे, सुरत, बेंगलोर आणि कोलकाता सारख्या शहरांमध्ये यांचे युनिट्स आहेत. या माध्यमातून ते चांगली उत्पन्न मिळवत असून दहा लोकांना रोजगार देखील या माध्यमातून उपलब्ध करून दिला आहे. सुमेर यांनी बिजनेस मध्ये शिक्षण घेतले असून वेगवेगळ्या कंपनीमध्ये काम देखील केले आहे. ऋतिक रमेश आणि बसन पाटील हे सुमैर चे मित्र असून त्यांचे शिक्षण देखील अमेरिका येथे बिजनेस मध्ये झाली आहे. त्यांच्या मदतीने सुमैरने हे स्टार्टअप सुरू केले आहे.
नक्की वाचा:जवाहर मॉडेलचा करा पिके घेण्यासाठी वापर, होईल कमी खर्चात जास्त उत्पादन
2020 या वर्षी स्टार्टअपची सुरुवात
याबाबतीत सुमेर म्हणतो की, मला कायम वाटायचे की देशांमध्ये प्लांट बेस्ड मिल्क इंडस्ट्रीला खूप संधी आहे. खूप कमी प्रमाणात या क्षेत्रात लोक काम करीत आहेत. आशा मध्ये या संधीचं सोनं करून जर या क्षेत्रामध्ये काम सुरू केले तर चांगली कमाई होऊ शकते. या गोष्टींचा सगळा विचार करून त्यांनी 2020मध्ये तीघ मित्र मिळून Alt co या नावाने स्वतःची कंपनी सुरु केली आणि ओट पासून दूध बनवायला सुरुवात केली.
याबाबतीत सांगताना सुमेर म्हणतो की, देशामध्ये सोयामिल्क बनवणाऱ्या बऱ्याच कंपन्या आहेत. परंतु आम्ही ओट पासून दूध तयार करण्याचा निर्णय घेतला. कारण यामध्ये शरीराला आवश्यक असणारे न्यूट्रिशन खूप असतात आणि आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. एवढेच नाही तर विटामिन बि ची मात्र देखील याच्या मध्ये जास्त प्रमाणात आहे. तसेच शरीरातील हाडांना मजबूत बनवण्यासाठी महत्त्वाची भूमिका ओट निभावते. तसेच लहान मुलांसाठी देखील हे फायदेशीर असल्यामुळे आम्ही यावर फोकस केला असे सुमैर सांगतो. त्यांनी ओट पासून दूध तयार करण्यासाठी देशातील कर्नाटक, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि दिल्ली सोबत बऱ्याच राज्यांमध्ये युनिट स्थापन केली आहेत. या ठिकाणी प्रॉडक्शनचे काम देखील सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी त्यांनी या क्षेत्रातील एक्सपर्ट लोकांची एक टीम हायर केली असून जेणेकरून या संबंधीचे संशोधन आणि प्रोसेसिंग चे काम सहजतेने करता येईल.
बऱ्याच शहरांमध्ये असलेल्या रिटेल स्टोअर मध्ये त्यांनी आपले प्रॉडक्ट विक्रीसाठी ठेवले आहे. सुमेर आपल्या उत्पादनाचे मार्केटिंग ही स्वतःच्या वेबसाईट वरून तसेच फ्लिपकार्ड आणि ऍमेझॉन सारख्या साईटचा वापर करून देखील जोरदार मार्केटिंग करत आहेत. एका महिन्या मध्ये या माध्यमातून त्यांना चांगल्या प्रकारे ऑर्डर मिळतात. दोन वर्षांमध्ये त्याने चांगली ग्रोथ केली असून येणाऱ्या काही दिवसात संपूर्ण देशात युनिट स्थापन करण्याचा त्यांची योजना आहे. या उत्पादनाच्या एका पॅकेट ची किंमत 299 रुपये आहे.
गाई आणि म्हशीचे दुध आणि प्लांट बेस्ड दूध यामधील फरक
प्लांट बेस्ड मिल्क चे वैशिष्ट्य म्हणजे हे लॅक्टोज फ्री असते. त्यामुळे बरेच लोक गाई किंवा म्हशीच्या दुधापेक्षा या दुधाला जास्त प्रेफर करतात. या दुधाची एक जमेची बाजू म्हणजे या दुधाची चव हे होय. कारण बरेच लोक चवीमुळे ॲनिमल मिल्क पेक्षा या मिल्कला जास्त पसंत करतात. तसेच प्लांट बेस्ड मिल्क मध्ये लोक आपल्या पसंतीनुसार यामध्ये फ्लेवर ॲड करू शकतात. एवढेच नाही तर यामध्ये फॅटचे सुद्धा मात्रा कमी असते. या दुधात तुम्ही तुमच्या गरजे नुसार मिनरल्स किंवा विटामिन्स ऍड करू शकतात. जनावरांपासून मिळणाऱ्या दुधात या गोष्टी करता येत नाही.
भारतातील प्लांट बेस्ड मिल्कचे मार्केट
भारतामध्ये याचे मार्केट खूप जलद गतीने वाढत असून जवळजवळ पंचवीस ते तीस मिलियन डॉलर पर्यंत त्याची बाजारपेठ आहे.
यामध्ये जास्त वाटा हा सोया मिल्कचा आहे. यानंतर आलमंड आणि ओट्स बेस्ड मिल्कचा नंबर लागतो. जर आपण यामधील व्यवसायाचा विचार केला तर या क्षेत्रात खूप मोठा स्कोप आहे. बरेच स्टार्टअप या क्षेत्रात येत आहेत. खरंतर याची प्रोसेसिंग ही खर्चिक आहे. गाई आणि म्हशीच्या दुधापेक्षा याची किंमत देखील जास्त आहे. या गोष्टींचा परिणाम हा विक्री करणाऱ्या वर आणि खरेदी करण्याचा वर देखील होतो. त्यामुळे अजूनही बरेच लोक या क्षेत्रातील हा धोका पत्करायला तयार नाहीत. (संदर्भ-दैनिक भास्कर)
Share your comments