कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल तर माणसाच्या अंगी चिकाटी कष्ट आणि मेहनत महत्वाची असते. मग ते क्षेत्र कोणते का असेना. सध्या शेतीमध्ये आणि पीक पद्धती मध्ये मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पारंपरिक पीक पद्धत पूर्णपणे संपण्याच्या मार्गावर आली आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि रासायनिक खतांचा वापर यामुळे उत्पादनात वाढ होत आहे शिवाय फायदा सुद्धा बक्कळ मिळत आहे. त्यामुळे सध्या च्या शेतीला आधुनिकतेची जोड असणे खूप आवश्यक आहे.
प्रगत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर:-
शेती मध्ये आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली चा वापर करून शेती करणे खूप गरजेचे आहे. आधुनिक आणि पारंपरिक शेती पद्धती मध्ये खूप फरक आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीने शेती केल्यास शेतकरी वर्गास मोठा तोटा सहन करावा लागत आहे. तसेच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केल्यास कमी वेळात जास्त उत्पादन मिळत आहे त्यामुळं प्रगती साठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती करणे खूप आवश्यक आहे.
सुपारी, नारळ आणि काजूची बाग:-
चक्क सरकारी नोकरी सोडून कर्नाटक राज्यातील रट्टाडी या गावातील सतीश हेगडे या तरुण शेतकऱ्याने अश्यक्य ही शक्य करून आपल्या नवीन पिढी पुढे आदर्श निर्माण केला आहे. सध्या सतीश हेगडे यांनी आपल्या शेतात 4000 पेक्षा जास्त सुपारीच्या झाडाची लागण केली आहे तसेच 350 पेक्षा जास्त नारळाची झाडे लावली आहेत. याचबरोबर सतीश हा कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसाय सुद्धा करून त्यामधून हजारो रुपये कमवत आहे.सतीशने आपले डिप्लोमा चे शिक्षण पूर्ण केल्यावर सतीश ला बीएसएनएलमध्ये सरकारी नोकरी मिळाली परंतु या कामात रस नसल्यामुळे त्याने ही नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. आणि वडिलोपार्जित असलेली शेती करण्यास सुरुवात केली. आणि शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीमध्ये अनेक विविध प्रकारची झाडे लावली आणि त्यातून बक्कळ पैसे कमवत आहे. शिवाय नवनवीन आणि आधुनिक वाणाच्या झाडांची लागवड करून उत्पादन वाढवले.
नापीक जमीन सुपीक करण्यास केले प्रयत्न:-
शेती म्हटलं की त्यासाठी आवश्यक आली ती म्हणजे खत आणि सुपीक जमीन. सुपीक जमिनीत पिके चांगली येतात शिवाय उत्पादन सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढते. शिवाय मिळालेल्या नापीक जमिनीत माती ची भरणी केली आणि रासायनिक खतांचा वापर वाढवल्यामुळे नापीक जमीन सुद्धा सुपीक झाली. अखेर खडतर प्रयत्नातून नापीक जमीन सुपीक केली.
सतीश हेगडेना अनेक पुरस्कार:-
सतीश हेगडे यांच्या अतुलनी कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत सण 2015 मध्ये सतीश हेगडे यांना धर्मस्थळ कृषी पुरस्कार तसेच 2017 मध्ये कुंदापूर तालुका उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार आणि सबलदी शीनाप्पा शेट्टी पुरस्कार 2018 साली त्यांना देण्यात आला आणि 2015 ते 2017 मध्ये सतीश ने DRDP च्या कुंदापूर तालुका केंद्रीय समाजाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. याचबरोबर सतीश हेगडे हे अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण सुद्धा देतात.
Share your comments