मराठवाड्यातील बीड जिल्हा म्हटला म्हणजे ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु याच बीड जिल्ह्यातील एका शेतकरीकन्याने अभूतपूर्व कामगिरी करून दाखवली आहे.जिद्दीच्या बळावर पहिल्याच प्रयत्नात बीडच्या या शेतकरी कन्येने यूपीएससी परीक्षेत IES परीक्षेत राज्यात पहिले तर भारतात 36 व्या रँकवरयेण्याचा मान मिळवला आहे.
बीडमध्ये शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि संपूर्ण परीक्षेची तयारी आणि अभ्यास घरूनच करून यशाला गवसणी घालणाऱ्या या शेतकरी कन्याचे नाव आहे श्रद्धा नवनाथ शिंदे.श्रद्धा यांनी यूपीएससी च्या माध्यमातून घेण्यात येणाऱ्या अभियांत्रिकी सेवा परीक्षेत राज्यात पहिलीतर देशात छत्तिसावी रँक मिळवली आहे. श्रद्धा यांचे वडील हेमूळचे बीड तालुक्यातील लोणी शहाजनपुर येथील असून अल्पभूधारक शेतकरी आहेत तर त्यांच्या आई गृहिणी असूनअशिक्षित आहेत.
श्रद्धा यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे बीडमध्ये झालेले आहे. नंतर त्यांनी औरंगाबाद येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण करून सन2018साली अभियांत्रिकीची पदवी हाती घेतली. त्यानंतर थेट दिल्लीला जाऊन सात महिने शिकवणी केली.
त्यांच्या यशाविषयी त्यांचे वडील नवनाथ शिंदे म्हणतात की, मी एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून लहानपणापासून श्रद्धाचीजिद्द शिकायची होती. तिच्या शिक्षणासाठी मी खूप काही केले असून तिने यामध्ये मोठे यश मिळवले आहे.
श्रद्धाला मी एक मुला प्रमाणे सांभाळले आहे असे ते म्हणाले. लोक म्हणतात की मुलगी आहे म्हणून अठरा ते वीस वर्षाची झाली की तिचं लग्न करायचं, शिकवायचे नाही परंतु मी तसे न करता त्यांना शिकवलं. आज माझ्या जीवनातला सर्वात मोठा आनंद आहे अशी प्रतिक्रिया श्रद्धा चे वडील नवनाथ शिंदे यांनी दिली आहे.
(स्त्रोत-ABP माझा)
Share your comments