शेतकरी राजा शेतीबरोबर अनेक छोटे मोठे व्यवसाय करून आपले उत्पन्नाचे मार्ग वाढवत असतो. त्यामध्ये अनेक संलग्न व्यवसाय सुद्धा आहेत शेळीपालन पशुपालन दुघव्यवसाय इत्यादी आहेत. सर्वात महत्वाचे म्हणजे शेती चांगली पिकवायची असली तर त्यासाठी जमिनीला खताची जोड असणे आवश्यक आहे. खताशिवाय शेतीला अजिबात पर्याय नाही.
या लेखात आपण कोल्हापूर एका महिलेने चक्क गांडूळ निर्मिती मधून लाखो रुपये कमवत आहे. शेतकरी वर्गापुढं एक आदर्श निर्माण केला आहे शेतीबरोबर गांडूळ खताची निर्मिती आणि विक्री करून ही महिला वर्षा काठी लाखो रुपये कमवत आहे. कोल्हापूर मधील विजया माळी या महिलेने शेती करत करत सेंद्रिय खत म्हणजेच गांडूळ खताची विक्री करून लाखो रुपये कमावले आहेत. एखाद्या युवा शेतकऱ्याला सुद्धा लाजवेल असा विजया माळी यांचा प्रवास राहिलेला आहे.शेतीमध्ये आधुनिकीकरण आले परंतु पुन्हा एकदा लोक सेंद्रिय शेती कडे वळू लागली आहेत. विजया माळी यांनी गांडूळ खत निर्मिती आणि विक्री वर मोठ्या प्रमाणात भर दिला आहे त्यामुळे आता गांडूळ खताची मागणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढत आहे.
कृषी विज्ञान केंद्राकडून मदत:-
विजया माळी यांच्याकडे एकूण अडीच एकर शेती आहे. आणि याच अडीच एकर जमिनीवर त्या शेती करतात. शेतीबरोबर त्या गांडूळ खत निर्मिती आणि सेंद्रिय खत निर्मिती करून विकत आहेत यातून त्या लाखो रुपये कमवतात. डीडी किसान यांच्या एका अहवालानुसार विजया माळी यांनी खादी ग्रामउद्योग महामंडळाने जिल्हा परिषदेच्या मदतीने सेंद्रिय खत आणि गांडूळ खत निर्मिती आणि त्याचा व्यापार सुरू केला आहे.तसेच कोल्हापूर मधील कृषी विज्ञान केंद्रात जाऊन विजया माळी यांनी गांडूळ खत निर्मितीचीच्या वैज्ञानिक पद्धती विषयी माहिती जाणून घेतली आणि प्रशिक्षण सुद्धा येथेच घेतले आहे.
रोजगाराच्या संधी:-
सेंद्रिय शेतीमुळे शेतीमध्ये वाढते उत्पन्न आणि सेंद्रिय खताची आणि गांडूळ खताची वाढती मागणी यामुळे विजया माळी यांचा व्यवसाय जोराने वाढू लागला आहे. विजया माळी या समर्थ अॅग्रो प्रॉडक्ट् च्या मदतीने सेंद्रिय खतांची विक्री संपूर्ण महाराष्ट्र भर करत आहेत. तसेच व्यवसायची वृद्धी होत असल्यामुळे गावातील महिलांना सुद्धा तिथे रोजगार उपलब्ध होत आहे.
कंपोस्ट खताला अन्य राज्यातून मागणी:-
सेंद्रिय शेती चे महत्व दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे कंपोस्ट खतांना आणि सेंद्रिय खतांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. कंपोस्ट खत निर्मिती आणि विक्री मधून विजया माळी वर्षाकाठी 5 ते 6 लाख रुपये कमवत असतात. महाराष्ट्र कर्नाटक गोवा गुजरात अश्या अन्य राज्यातून सेंद्रिय खतांची मागणी मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच यातून विजया माळी यांचा व्यवसाय सुद्धा वाढत चालला आहे.
Share your comments