शेतीमधून जास्त उत्पादन काढायचे असेल तर त्यासाठी जास्त मेहनत करावी लागतेच पण त्यासोबतच आपणास शेतीमध्ये नवीन नवीन तंत्रज्ञानाचा वापर सुद्धा करावा लागतो तेव्हा आपल्या शेतातील उत्पादनाचा दर्जा वाढतो. कर्नाटक राज्यातील रट्टाडी गावामध्ये सतीश हेगडे हे शेतकरी राहतात जे को सतीश यांनी आपल्या शेतीमध्ये कठोर परिश्रम तसेच प्रामाणिकपणे प्रयत्न आणि अगदी जिद्ध व चिकाटीने नापीक जमिनीमध्ये पीक घेऊन त्याचे सोने च तयार केले आहे.
प्रगत तंत्रज्ञानाने शेती :-
सतीश हेगडे यांनी त्यांच्या शेतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांची लागवड तर केली आहेच पण सोबतच शेतामध्ये विविध प्रकारची तंत्रे सुद्धा आणलेली आहेत. सतीश यांनी फक्त आधुनिक शेतीच केली नाही तर त्यासोबत पारंपरिक शेती सुद्धा केली आहे. सतीश यांच्या शेतीमध्ये जास्त करून सुपारी ची झाडे आहेत. जसे की त्यांच्या शेतामध्ये विविध प्रजातींची सुपारी ची झाडे आहेत. एवढेच नाही तर गोड्या पाण्यातील मत्स्यशेतीचा प्रयोग सुद्धा त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेला आहे. पश्चिम घाट प्रदेशातील हा एक अनोखा पर्याय म्हणून बघितले जाते.
सुपारी, नारळ, काजूची हजारो झाडे :-
सतीश हेगडे यांच्या शेतजमिनीत ४ हजार पेक्षा जास्त सुपारी ची झाडे आहेत तर ३५० पेक्षा जास्त नारळाची झाडे आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्या शेतजमिनीत केळी तसेच काजू ची सुद्धा झाडे आहेत. सतीश हेगडे दुग्धव्यवसाय सुदडब करतात आणि कुक्कुटपालन सुद्धा करतात. सतीश हेगडे यांचा इलेक्ट्रिक विषयातून डिप्लोमा पूर्ण झालेला आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सतीश यांना बीएसएनएलमध्ये नोकरी सुद्धा मिळाली होती. सतीश याना नोकरीमध्ये मन लागत नसल्यामुळे त्यांनी आपले लक्ष शेतीकडे ओळवले. वडिलोपार्जित शेतीचा विकास करायचा असा ठाम निर्धार त्यांनी हाती घेतला. शेतीसाठी मजुरांची टंचाई भासू लागल्यामुळे ते स्वतः सकाळपासून ते रात्रीपर्यंत काम करत असायचे. स्वतः त्यांनी सुपारी च्या झाडांची लागवड केली.
नापीक जमीन केली सुपीक :-
सतीश यांनी आपल्या जमिनीमध्ये सुपारीची विठ्ठल, मोहित नगर, इंटर मोहित आणि इंटर सी या जातीची झाडे लावली. सतीश यांनी सेंद्रिय खतांचा अभ्यास करून त्यामधून चांगला अनुभव मिळवला आणि झाडांना सेंद्रिय खत घातले. सतीश यांनी फक्त चार वर्षातच त्यांनी जमिनीला हिरवेपन आणले. सतीश यांनी आपल्या शेतीमध्ये पपई ची सुद्धा लागवड केली जे की तैवानी पपई असे पपई च्या जातीचे नाव आहे.
अनेक पुरस्कारांचे मानकरी :-
सतीश हेगडे या शेतकऱ्याच्या नाविन्यपूर्ण कामगिरीमुळे २०१५ साली त्यांना धर्मस्थळ कृषी पुरस्कार तसेच २०१७ साली त्यांना कुंदापूर तालुका उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार तर २०१८ साली सतीश यांना सबलदी शीनाप्पा शेट्टी पुरस्कार देण्यात आला. सतीश हेगडे या शेतकऱ्याने २०१५ साली कुंदापूर तालुक्यामधे केंद्रीय समाजाचे अध्यक्ष म्हणून काम सुदधा केले आहे.
Share your comments