मागील काही दिवसांपासून राज्यातील काही भागामध्ये पावसाने आपले चांगल्याच प्रकारे थैमान मांडलेले आहे त्यामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे जे की काही भाग पूरग्रस्त झालेला आहे तर काही लोकांचे भरपूर प्रमाणात नुकसान झालेले आहे. महाराष्ट्र राज्य मधील कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्र मधील काही भाग आणि विदर्भ मधील काही जिल्ह्यामधील भरपूर प्रमाणात पाऊस पडल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.
परंतु येवला मधील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतामध्ये कारल्याचे पीक लावल्याने त्यास भरपूर प्रमाणात उत्पादन मिळाले आहे. त्या शेतकऱ्याने त्याची द्राक्षाची बाग तोडून शेतात कारले लावले असल्याने त्यांना लाखो रुपयांचा फायदा मिळाला आहे.महाराष्ट्र राज्यामध्ये मागील आठवड्यात पावसाने मोठ्या प्रमाणात आपले थैमान मांडल्यामुळे रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा मध्ये पाण्याची पातळी एवढी वाढलेली आहे की तिथे धोका निर्माण झाला आहे. त्या ठिकाणी जो भाव आहे तो सर्व पाण्याखाली गेलेला आहे.तसेच पश्चिम महाराष्ट्रात सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा मध्ये आकाश फाटल्या सारखा पाऊस पडलेला आहे. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे तिथे असणाऱ्या सर्वच नद्यांचे स्वरूप बदलले आहे. पावसाने आपले थैमान मांडल्यामुळे राज्यासमोर एक नवीनच संकट उभे राहिलेले आहे.
हेही वाचा:कोरोनाच्या काळात इंजिनिअर, एमबीए बेरोजगारांनी धरली कुक्कुटपालनाची वाट.
द्राक्षाची बाग तोडून कारल्याचे पीक:
मुसळधार पाऊसामुळे राज्यामसोर अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली असून सुद्धा एका शेतकऱ्याला अशा परिस्थिती मध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. नवनाथ लभडे हा शेतकरी येवला तालुकामधील निमगाव मढ या गावात राहतात. नवनाथ लभडे यांनी त्यांची द्राक्षाची बाग तोडून त्या ठिकाणी त्यांनी कारल्याचे पीक घेतले होते त्यामधून नवनाथ लभडे याना मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळाले आहे. नवनाथ लभदे या शेतकऱ्याने त्याच्या एक एकर शेतामध्ये कारले लावले होते.नवनाथ लभडे या शेतकऱ्याने कारल्याच्या पिकासाठी शेतामध्ये ७० हजार रुपये खर्च केला आहे जे की अत्ता पर्यंत त्यांनी कारल्याची ३५० कॅरेट विकलेली आहेत त्यामुळे त्यांना यामधून चांगला फायदा मिळून जो खर्च झालेला आहे तो यामधून मिळला आहे.
यापुढे नवनाथ लभडे यांची कमीत कमी अडीच हजार कारल्याची कॅरेट विकली जातील असे त्यांनी सांगितले आहे तसेच यामधून त्यांना कमीत कमी साडे चार ते पाच लाख रुपये भेटतील असे नवनाथ लेबडे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.
Share your comments