काळाच्या ओघानुसार शेतकरी कमी खर्चात जास्त उत्पादन निघण्यासाठी शेतकरी आपल्या शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. मात्र बिहारमधील चपरान जिल्ह्यात एका शेतकऱ्याने ब्रासिका ओलेरेसिया या कंपनीच्या वाणाची लागवड केलेली आहे. सर्व वानात केशरी कोबीची जात उत्तम ठरलेली आहे. या वाणाच्या कोबीत पोषकतत्वे जास्त असल्याने जास्त दर मिळतो. सूत्रांच्या माहितीनुसार चपरणा जिल्ह्यातील शेतकरी परदेशी भाज्यांची लागवड करून वेगळेपणा सिद्ध करत आहेत. त्या भागातील शेतकरी कॅनडा मधील कोबीची लागवड करत आहेत. या शेतकऱ्याने केशरी कोबी ची लागवड करून १० हजार रुपये खर्च केला आहे सर्व खर्च वजा करून त्यांना लाख रुपये फायदा झालेला आहे.
केशरी कोबीतून उत्पादकता अधिक :-
बिहारमधील समुता गावात राहणारे आनंद हे शेतकरी पहिल्यापासून आधुनिक शेती करत आहेत. आनंद यांनी यंदा आपल्या शेतीमध्ये संत्रा कोबी, बागणी कोबी आणि स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. आनंद याना वर्षाकाठी मखाना आणि मत्स्यव्यवसायातून लाखो रुपये कमवत आहेत. याव्यतिरिक्त आनंद सिंग आपल्या शेतात केशरी कोबीची लागवड करत आहेत जो कोबी जगात विविध नावांनी ओळखला जात आहे. आनंद यांचे असे मत आहे की या कोबीच्या शेतीमधून सात ते आठ पटीने जास्त उत्पन्न निघते.
खर्च 10 हजाराचा अन् उत्पादन लाखो रुपयांचे :-
स्थानिक बाजारात जांभळ्या आणि केशरी कोबीचा दर ५० ते ६० किलो रुपये आहे. आनंद सिंग यांनी सांगितले की या कोबीची एक एकरात लागवड केली तर जास्तीत जास्त १०००० ते १२००० रुपये खर्च येतो तर त्यामधून जवळपास लाखो रुपये फायदा मिळतो. आनंद सिंग यांनी त्यांच्या कोबी लागवडीची माहिती त्यांच्या फेसबुक पेजवर सुद्धा टाकली आहे. आनंद सिंग यांनी ऑनलाईनद्वारे बियाणे मागवून कोबीची लागवड केली आहे.
काय आहे कृषी तज्ञांचा सल्ला?
केंद्रीय विद्यापीठातील ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. राजेंद्र प्रसाद आणि डॉ. एस. के. सिंह यांनी सांगितले आहे की ही जात मूळ ची कॅनडा येथील आहे जे की या जातीच्या कोबीमध्ये अ जीवनसत्त्व आहे त्यामुळे आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच यामध्ये व्हिटॅमिन सी देखील आहे. त्यामुळे या कोबी ला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ब्रिटन आणि फ्रान्स मध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या कोबी ची लागवड केली जात आहे.
Share your comments