भारतामध्ये शेती हा अनिश्चित असलेला व्यवसाय आहे हा समज अनेक वर्षापासून चालू आहे. मागील अनेक वर्षांपासून शेतकरी हवामानामुळे तसेच शासकीय धोरणांमुळे संघर्ष करीत आहे. मागील काही वर्षांपासून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतीतून जास्त उत्पादन निघत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आता हळूहळू आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर समजला आहे जे की यामुळे शेतीतून यामुळे जास्त उत्पादन निघते.
कमी शेतीतून निघू शकते ८-१० लाख रुपयांचे उत्पन्न :-
आजच्या स्थितीला उच्चशिक्षित असणाऱ्या लोकांनी सुद्धा आपला कल शेतीकडे ओळवला आहे. हिंगोली जिल्ह्यातील संभाजी सीताराम गुंजकर या शेतकऱ्याने सांगितले आहे की जर तुमच्याकडे थोड्या प्रमाणात जरी जमीन असेल तरी सुद्धा तुमचे वार्षिक उत्पन्न ८-१० लाख रुपये निघू शकेल. जे की संभाजी गुंजकर यांनी प्रत्यक्षात हे करून दाखवले आहे. तुम्ही जर संभाजी गुंजकर या शेतकऱ्याचे नियोजन तसेच व्यवस्थापन बघितले तर तुम्ही सुद्धा तुमचा कल शेतीकडे ओळवचाल. संभाजी गुंजकर यांनी आपल्या शेतात नवीन नवीन प्रयोग करून चांगल्या प्रमाणत बदल घडवून आणले आहेत.
२० वर्षांपासून करतायत फुलांची शेती :-
संभाजी गुंजकर हे शेतकरी हिंगोली मधील पिंपरखेड या गावचे रहिवासी आहेत. संभाजी गुंजकर हे शेतकरी आपल्या यशाचा श्रेय फक्त मेहनत आणि शेतीची योग्य पद्धत या दोन गोष्टींना देत आहेत. संभाजी गुंजकर हे शेतकरी २००२ पासून नोकरीच्या मागे न लागता आपल्या शेतात फूल शेती केली आहे. सुरुवातीला संभाजी गुंजकर याना फुलशेती करण्यास भरपूर अडचणी आल्या मात्र आता २० वर्ष झाले असल्याने त्यांना यामधून चांगला अनुभव आलेला आहे.
आठ एकर शेतीमधून काढतायत पाच लाख रुपयांचे उत्पन्न :-
संभाजी गुंजकर यांना सर्व मिळून ८ एकर शेती आहे जे की त्यामधील अडीच एकरात ते फुलाची शेती करत आहेत. त्यामध्ये गुलाब, अस्ट्ट, लीलि, बीजली, मोगरा, झेंडू या फुलांची शेती करत आहेत. जी फुले तयार झाली आहेत त्याचा स्वतः ते हार करून हिंगोलीमध्ये जाऊन बाजारात विक्री करत आहेत. संभाजी गुंजकर यांचा सर्व खर्च जाऊन त्यांना पाच लाख रुपये चा नफा मिळाला आहे. त्यांच्या शेतामध्ये सर्व मिळून १४ शेतकरी काम करत आहेत. संभाजी गुंजकर सांगतात की शेतकऱ्यांनी काळानुसार आपल्या पिक पद्धतीमध्ये बदल करणे गरजेचे आहे. संभाजी गुंजकर यांच्या परिसरातील अनेक शेतकरी त्यांच्या शेतात जाऊन मार्गदर्शन घेत आहेत. संभाजी गुंजकर यांना त्यांच्या गावामध्ये एक प्रगतशील शेतकरी म्हणून सर्वजण बघतात.
Share your comments