शेतीमध्ये जर वेगळा प्रयोग करायचा असेल तर तो फक्त बोलून किंवा स्वप्न साधून होत नाही तर तो सत्यात उतारावा लागतो आणि त्यासाठी प्रत्यक्षपणे शेतीच्या बांधावर सुद्धा जावे लागते आणि हेच केज तालुक्यातील केकाणवाडीतील बाबासाहेब केकान यांनी करून दाखवले आहे. बाबासाहेब यांनी मागील वर्षी आपल्या शेतात गाजराची लागवड केली आहे जे की पाच गुंठ्यातील गाजरांणी बाबासाहेबांना २५ हजार रुपयांचा नफा मिळवून दिलेला होता. बाबासाहेब यांनी यंदा चे गाजर मकरसंक्रातीच्या तोंडावर बाजारात आणायचे असे नियोजन लावले होते, त्याच दरम्यान त्यांनी फक्त ३ दिवसात २० क्विंटल गाजराची बाजारपेठेत विक्री करून ५० हजार कमावले आहेत तर एकरात जे गोड गाजर लावले होते त्यामधून त्यांनी २ लाख रुपये कमावले आहेत.
लागवड पध्दत व खताचे नियोजन :-
गाजराचे पिक तीन महिन्यात येते जे की त्यासाठी बाबासाहेब यांनी लागवड करण्यापूर्वी नांगरणी, मोगडा, एक बैल पाळी अशाप्रकारे मशागत केली. ऑक्टोबर महिन्याच्या अखेर त्यांनी दहा किलो गाजराचे बियाणे प्रति एकरसाठी आणले. बियाणांची चांगल्या प्रकारे उगवण व्हावी यासाठी सुरुवातीला एक पाळी आणि एक महिन्याने दुसरी पाळी दिली. एक पोते डीएपी खत आणि एक पोते सिंगल सुपर फॉस्फेट अशा प्रकारे खताची मात्रा दिली. गाजराची संपूर्ण वाढ होण्यासाठी जवळपास ९० दिवसांचा कालावधी लागला.
गावालगतच्या शहरात बाजारपेठ :-
बाबासाहेब यांनी पिकलेले गाजर स्वतःच अंबाजोगाई शहरातील मार्केटमध्ये जाऊन विकले जे की यामुळे वाहतुकीचा खर्च देखील वाचला आणि गाजराला दर सुद्धा चांगला मिळाला. संक्रातीच्या तोंडावर बाबासाहेब यांनी मार्केट मध्ये गाजर विकले जे की २ क्विंटल गाजर विकून त्यांना ५० हजार रुपये नफा राहिला तर एकरी गाजर विकून सर्व खर्च जाता त्यांना दीड लाख रुपये नफा मिळाला. बाबासाहेब सांगतात की यास जास्त पाणी पण लागत नाही तसेच वातावरणाचा कोणताही परिणाम गाजराच्या शेतीवर पडत नाही.
कुटुंबियाचे परिश्रम आले कामी :-
काळाच्या ओघानुसार शेतीकामासाठी मजूर कमी पडतात त्यामुळे पिकाची लागवड करण्यासापासून ते पिकाची काढणी करण्यापर्यंत बाबासाहेबांच्या घरच्या सदस्यांनी हातभार लावला. बाबासाहेबांनी सांगितले की मशागत, पाण्याचे व्यवस्थापन तसेच तोडणी आणि बाजारपेठेत विक्री करेपर्यंत घरच्यांनी साथ दिली.
Share your comments