शेतकऱ्यांचा कल सध्या पारंपरिक शेती सोडून आधुनिक शेतीकडे वळत आहे.पारंपरिक पिके घेण्याला शेतकरी सध्या टाळत असून नवनवीन पिके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल सध्या वाढताना दिसत आहे.
बरेच शेतकरीड्रॅगन फ्रुट,विविध प्रकारचा विदेशी भाजीपाला,स्ट्रॉबेरी एवढेच नाही तर सफरचंद सारखे सुद्धा पिक आपल्या महाराष्ट्रात शेतकरी घेऊ लागले आहेत.हेपीके घेताना शेतकरी विविध प्रकारचे तंत्रज्ञान चा वापर करीत असून त्या माध्यमातून चांगला नफा कमवितआहेत.तसेच फुल शेती च्या माध्यमातून देखील शेतकरी चांगली आर्थिक प्रगती करीत आहे.या लेखामध्ये आपण अशाच एका शेतकऱ्याची माहिती घेणार आहोत ज्यांनी फुलशेतीच्या माध्यमातून चांगला पैसा कमावला आहे. या शेतकऱ्यांनी शेतीमध्ये जपानी कैल फुलांची लागवड केली आहे.
या शेतकऱ्याची यशोगाथा
पलवल येथील पाटली खुर्द गावातील शेतकरी रणबीर यांनी आपली मेहनत आणि तंत्रज्ञानाच्या जोरावर आपल्याकडील मातीत अनोखा प्रयोग करत जपानी फुलांचे उत्पादन घेतले आहे. रणधीर यांना 2013 मध्ये गाजीपुर मंडी तून कैल फुलांच्या लागवडीची कल्पना सुचली.
यासाठी त्यांनी चक्क जपानमधून या फुलांच्या बिया आयात केल्या होत्या. या शिवाय रणबीरने दुसऱ्या भागातील माती आणून आपल्या शेतात टाकली.या शेतीसाठी त्यांनी शेताच्या सभोवती कुंपण देखील केले.अगोदर त्यांनी प्रयोगासाठी अवघ्या अर्धा एकर क्षेत्रावर कैलफुलांची लागवड केली होती. परंतु आता हे क्षेत्र त्यांनी हळूहळू वाढवली असून सध्या त्यांच्याजवळ चार एकरात कैल फुलांची लागवड केली आहे.
कैल फुलांच्या शेतीमुळे होतोय एवढा नफा
कैल फुले बाजारात 40 रुपये प्रति फूल या दराने विकले जाते. लग्नसराईच्या दिवसात या फुलांची मागणी वाढते.
त्यामुळे या फुलांचा भाव हा प्रति फूल 60 रुपयांपर्यंत जातो. यापुढे शेतीच्या माध्यमातून रणबीर यांनी लाखो रुपये कमावले आहेत. रणबीर यांना फुलशेतीचे आवड असून त्यांनी पस्तीस प्रकारच्या फुलांची लागवड त्यांच्या शेतात केली आहे. त्यामुळे 2017 साली त्यांना सुवर्णपदक दिले गेले आहे.तसेच उद्यान विद्या विभागाकडून अनुदानही देण्यात आले होते.
Share your comments