देशातील नवयुवक सध्या शेतीपासून दुरावत चालले आहेत. निसर्गाच्या लहरीपणामुळे तसेच वाढत्या महागाईमुळे शेती करणे परवडत नसल्याचा बहाणा करत नवयुवक शेतकरी पुत्र शेतीऐवजी नोकरी करण्यास विशेष प्राधान्य देत आहेत.
एकीकडे नवयुवक शेतकरी पुत्रांचे शेतीवरचा मोहभंग होत आहे तर दुसरीकडे परभणी जिल्ह्यातील एका नवयुवक शेतकऱ्याने केवळ तीन महिन्यात आधुनिक पद्धतीने शेती करून लाखो रुपयांची उलाढाल केली आहे.
जिल्ह्यातील सेलू तालुक्याच्या मौजे माळसापुर येथील प्रशांत जाधव या नवयुवक शेतकऱ्याने आधुनिक शेतीची कास धरत शेडनेट उभारून भाजीपाला पीक लागवड करून लाखो रुपयांचा नफा कमावला आहे. यासाठी नवयुवक शेतकरी प्रशांत यांना कृषी विभागाचे मोठे अनमोल सहकार्य लाभले, कृषी विभागाच्या सहकार्याने प्रशांत यांनी भाजीपाला पिकातून केवळ तीन महिन्यात लाखो रुपयांचे उत्पन्न पदरात घेतले.
संबंधित बातमी:-अतिवृष्टीने बेजार झालेल्या शेतकऱ्यांना कलिंगड पिकाने दिली नवसंजिवनी; मिळवलं लाखोंचं उत्पन्न
परभणी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी समृद्ध ग्राम हा अभिनव उपक्रम हाती घेतला होता. या उपक्रमांतर्गत तालुक्यातून एका गावाची निवड होणार होती. या अनुषंगाने माळसापुर या गावाची समृद्ध ग्राम या उपक्रमात निवड झाली आहे. एवढेच नाही या गावाचा सामावेश पोखरा या योजनेत देखील केला गेला आहे.
संबंधित बातमी:-कांदा लागवड करण्यापेक्षा कांदा बियाणे विक्री करूनच 'या' शेतकऱ्याने छापले बक्कळ पैसे
प्रशांत हे कृषी पदवीधारक आहेत. त्यांच्याकडे वडिलोपार्जित दहा एकर शेती आहे. या दहा एकर शेतीपैकी अर्धा एकर शेतात कृषी विभागाच्या सहकार्याने शेडनेट उभारले. यामध्ये त्यांनी वेगवेगळ्या भाजीपाला पिकांची लागवड केली यात मिरचीचा देखील समावेश होता. प्रशांत यांनी भाजीपाला लागवड करून अवघ्या तीन महिन्यात सव्वा लाख रुपयांचे उत्पन्न कमविले आहे.
संबंधित बातमी:-लई झाक! 10 गुंठे क्षेत्रात 'हा' प्रयोगशील शेतकरी फुलशेतीमधून कमवतोय लाखों
प्रशांत यांनी शेडनेट उभारणी करून भाजीपाला पिकातून लाखो रुपयांचे उत्पन्न मिळवले. यामुळे गदगद झालेल्या प्रशांत यांनी यावर्षी पुन्हा कृषी विभागाच्या साह्याने अर्धा एकर क्षेत्रात शेडनेट उभारले आहे. यामध्ये त्यांनी काकडीची लागवड केली होती आणि अवघ्या दोन महिन्यात दहा टन काकडीचे उत्पादन त्यांना प्राप्त झाले. अजून दोन महिने काकडीची काढणी सुरू राहणार आहे प्रशांत यांना जवळपास 25 टन उत्पादनाची आशा आहे. उन्हामुळे काकडीला मागणी अधिक असून दर देखील चांगला मिळत आहे यामुळे प्रशांत यांना काकडीच्या पिकातून चार लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याची आशा आहे.
संबंधित बातमी:-भावा फक्त तूच रे……! कमी खर्चात कलिंगड आणि मिरचीचे उत्पादन घेऊन 'हा' शेतकरी बनला मालामाल
Share your comments