पारंपरिक पिकाला फाटा दिला म्हणजे निश्चितचं शेतीतुन चांगले उत्पादन मिळवता येऊ शकते. खरं पाहता पारंपारिक पीक पद्धतीत शेतकरी बांधवांना (Farmer) अधिक उत्पादन खर्च करावा लागत आहे शिवाय यामधून प्राप्त होणारे उत्पन्न (Farmers Income) देखील अतिशय तोकडे स्वरूपाचे आहे.
यामुळे काळाच्या ओघात यामध्ये आता बदल करणे अतिशय महत्वाचे आहे. या अनुषंगाने आता अनेक शेतकरी बांधवांनी पारंपरिक पीकपद्धतीला बगल देत नवीन पर्यायी पीक पद्धती स्वीकारायला सुरुवात केली आहे. आता देशातील अनेक शेतकरी बांधव पारंपरिक पिकाला फाटा देत फळबाग लागवड (Orchard planting) करू लागले आहेत.
फळबाग लागवड करून शेतकरी बांधव कमी खर्चात अधिक उत्पन्न सहजरीत्या प्राप्त करू शकतात. हरियाणा राज्यातील भुना येथील एका शेतकऱ्याने देखील पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देत फळबाग लागवड करून लाखो रुपये कमावण्याची किमया साधली आहे. भुना येथील शुभम याने पेरू या फळबाग वर्गीय पिकांची लागवड (Guava Farming) करून लाखों रुपयांचे उत्पन्न कमावले आहे.
महत्वाच्या बातम्या:
Successful Farmer: झेंडूची शेती ठरली शेतकऱ्यासाठी वरदान! झेंडु शेतीतुन कमवतोय लाखों
भावा फक्त तूच रे…! 10 गुंठ्यात ब्रॉकोली लागवड केली अन मिळवलं 2 लाखांचे उत्पन्न; वाचा काय होतं नियोजन
मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, पूर्वी शुभम इतर शेतकऱ्यांप्रमाणे पारंपरिक पिकांची शेती करत असत. शुभम गहू आणि धानाच्या लागवड करत मात्र यामध्ये शुभमला सतत नुकसान सहन करावे लागले. यामुळे शुभम यांनी शेतीमध्ये जरा हटके करण्याचा निर्णय घेतला आणि फळबाग लावावी असा विचार त्याच्या मनात आला.
सुरुवातीला त्याने दोन एकरात पीच आणि पेरूची लागवड केली, त्यांना अल्पावधीतच चांगले परिणाम दिसू लागले. यानंतर त्यांनी आपल्या बागेचे क्षेत्र 5 एकर आणि नंतर 7 एकरपर्यंत वाढवले आणि यातून त्यांना चांगली कमाई होऊ लागली.
शुभम सांगतो की, सतत गहू आणि धान या पारंपारिक पिकाची लागवड केल्यामुळे त्याच्या जमिनीची भूजलाची पातळी खालावली होती. यामुळे पाण्याची समस्या निर्माण होऊ लागली होती. शिवाय याचा पिकांवर विपरीत परिणाम होत होता. परिस्थिती एवढी बिकट बनली होती की, शेतीचा खर्च काढणे देखील मुश्किल झाले होते.
पारंपरिक पीकपद्धतीत खर्च देखील सातत्याने वाढत होता. यामुळे सातत्याने शुभमला शेतीमध्ये तोटा सहन करावा लागत होता. शुभम सांगतात की, सध्या त्यांनी 7 एकरात पीच आणि पेरूची लागवड केली असून सुमारे 7 लाखांचा निव्वळ नफा त्यांना मिळत आहे.
शुभम पेरू शेती विषयी माहिती देताना सांगतात की, त्याने पेरूच्या सुधारित जातीची लागवड केली आहे. त्याने सफेडा या पेरूच्या सुधारित प्रजातीची लागवड केली आहे. या जातीची खास गोष्ट म्हणजे, याची झाडे फक्त 10 महिन्यांत उत्पादन देण्यास सुरुवात करत असतात. याशिवाय या जातीच्या पेरू पिकाला अळीचे संक्रमण देखील होतं नाही.
हरियाणाच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या ट्विटनुसार, पीचच्या लागवडीतून 4 लाखांपर्यंत आणि पेरूपासून 2.5 लाखांपर्यंत नफा शुभम यांना मिळत आहे. निश्चितच शुभम यांनी शेतीमध्ये केलेला हा बदल इतर शेतकऱ्यांसाठी प्रेरणा देणारा आहे. यामुळे याची दखल हरियाणाच्या कृषी विभागाने देखील घेतली आहे.
Share your comments