पश्चिम महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात ऊस लागवड बघायला मिळते. यातूनच उस उत्पादक शेतकरी चांगली मोठी कमाई करतात. पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील उसाची लागवड लक्षनीय बघायला मिळते, सातारा जिल्ह्यामधील फलटण तालुक्यातील एका शेतकऱ्याने उसाचे विक्रमी उत्पादन घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. फलटण तालुक्यातील दऱ्याचेवाडी येथील संदीप न्यानदेव कदम यांनी एका एकरात तब्बल 114 टन उसाचे उत्पादन घेतले, त्यांच्या या विक्रमी उत्पादन आणि तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. फलटण तालुक्यात सर्वत्र याबद्दल चर्चा रंगली आहे.
तसे बघायला गेले तर फलटण तालुक्यातील दर्याचेवाडी हे एक दुष्काळग्रस्त गाव, दर्याचीवाडी म्हटलं की आठवत होती पाण्याची वन वन पण आता परिस्थिती बदलली आहे आता या शिवारात धोम-बलकवडी योजनेचे पाणी दाखल झाले आणि त्यामुळे शेतकऱ्यांचे नंदनवन झाले आहे. या योजनेमुळे शिवारातील शेतकरी चांगले सुखावले आहेत, यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन देखील वाढले आहे. या योजनेने आलेल्या पाण्यामुळेच संदीप ज्ञानदेव कदम यांनी उसाचे दर्जेदार उत्पादन घेतले आहे.
संदीप ज्ञानदेव कदम यांनी उसाचे 265 वाण आपल्या वावरात लावले होते, योग्य नियोजनातून सेंद्रिय खतांचा योग्य वापर करून संदीप यांनी एका एकरात तब्बल 114 टन उसाचे उत्पादन घेतले आहे. परिसरातील एक प्रतिष्ठित साखर कारखाना म्हणजे शरयू साखर कारखान्याचे संचालक शिवारातील शेतकऱ्यांसाठी उत्कृष्ट उसाचे बेणे उपलब्ध करून देणार आहेत त्यामुळे निश्चितच तेथील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा फायदा होणार आहे असे सांगितले जातेय. संदीप ज्ञानदेव कदम यांच्या फडावर शरयू चे संचालक आले असता त्यांनी संदीप यांच्या मेहनतीचे कौतुक केले, यावेळी संचालक यांनी संदीप यांनी घेतलेल्या विक्रम उसाच्या उत्पादनाबद्दल त्यांचे अभिनंदन देखील केले.
एकंदरीत धोम-बलकवडी योजनेचा शिवारातील शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे, या योजनेमुळे ऊस उत्पादक शेतकरी एवढे दर्जेदार उत्पन्न प्राप्त करत आहेत. एकेकाळी दुष्काळासाठी प्रसिद्ध असलेला हा भाग आता उसाच्या दर्जेदार उत्पादनासाठी ओळखला जातोय, त्यामुळे येथील शेतकरी नक्कीच अभिनंदनाचे पात्र आहेत. धोम-बलकवडी योजनेमुळे शिवारातील शेतकरी अनेक उपाययोजना शेतात वापरत आहेत तसेच अनेक नवनवीन पिकांची लागवड करत आहेत, शिवाय हे शिवार आता उसाच्या दर्जेदार उत्पादनासाठी ओळखले जात आहे.
Share your comments