1. यशोगाथा

सरकारी नोकरीला टाटा बाय बाय करत केली शेती; कमावले 16 लाख रुपये

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक लोक पर्यंत करत आहेत. पण सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र, सरकारी नोकरीला टाटा बाय बाय करत शेती केली आहे. हिंमत न हारता अधिक मेहनत घेतली आणि आधुनिक शेती करत 16 लाख रुपये कमवले आहेत.

Government job farming

Government job farming

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी अनेक लोक पर्यंत करत आहेत. पण सरकारी नोकरी मिळत नाही. मात्र, सरकारी नोकरीला टाटा बाय बाय करत शेती केली आहे. हिंमत न हारता अधिक मेहनत घेतली आणि आधुनिक शेती करत 16 लाख रुपये कमवले आहेत. शेतीत आधुनिक गोष्टींचा वापर करून ही किमया साधली आहे.

गुजरात मधील झालावाड जिल्ह्यातील कमलेश डोबरिया सरकारी नोकरी करत होते. गावात आल्यावर ते अनेकदा शेतकऱ्यांना भेटत असे. हळूहळू त्यांची शेतीची आवड वाढू लागली. त्यानंतर त्यांनी नोकरी सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. कमलेश डोबरिया यांनी जमीन विकत घेतली. आणि डाळिंबाची रोपे लावली. शेतीचे फारसे ज्ञान नसल्यामुळे सुरुवातीला त्यांना अडचणी सामना करावा लागला. आणि नुकसानीला सामोरे जावे लागले. परंतु त्यांनी हिंमत न हारता अधिक मेहनत घेतली. अनेक प्रगतीशील शेतकरी यांची भेट घेतली.

कमावले 16 लाख रुपये

मग त्याने एक गाय विकत घेतली. आणि शेणापासून खत बनवून शेती करायला सुरुवात केली. सिंचनासाठी शेतात ठिबक सिंचन यंत्रणा बसवली. आपल्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे कमलेश आज 16 लाखांचा नफा कमावत आहे. आज 4000 हून अधिक डाळिंबाची झाडे आहेत. डाळिंब तसेच पेरू, लिंबू आणि करवंदाची लागवड करत आहेत. डाळिंबाची लागवड प्रामुख्याने उत्तर प्रदेश, गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, हरियाणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू या राज्यांमध्ये केली जाते.

English Summary: Tata bye bye to government job farming; Earned Rs 16 lakh Published on: 04 February 2022, 11:52 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters