1. यशोगाथा

सेवानिवृत्त प्राध्यापकाने केली कलिंगडाची लागवड, अवघ्या दीड एकरात लाख रुपयांचे उत्पादन आणि इराणला निर्यात

कुठलाही व्यवसाय असला तरी त्या व्यवसायातील बारकावे, अचूक व्यवस्थापन,बाजारपेठेचा अभ्यासव त्यादृष्टीने जर नियोजन केले तर यश हमखास मिळते. या गोष्टी शेतीव्यवसायाला सुद्धा तंतोतंत लागू होतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
symbolic image

symbolic image

कुठलाही व्यवसाय असला तरी त्या व्यवसायातील बारकावे, अचूक व्यवस्थापन,बाजारपेठेचा अभ्यासव त्यादृष्टीने जर नियोजन केले तर यश हमखास मिळते. या गोष्टी शेतीव्यवसायाला सुद्धा तंतोतंत लागू होतात.

पूर्वापार चालत असलेली शेती म्हणजे तोट्याचा व्यवसाय ही संकल्पना काही प्रमाणात  आता मागे पडत चाललेली आहे. कारण बरेच शेतकरी आता परंपरागत पिकांकडे पाठ फिरवून तंत्रज्ञानाचा आधार घेऊन नवनवीन पिकांचे लागवड करीत आहेत. त्या सगळ्या प्रयोगाला तंत्रज्ञान तसेच वेगवेगळ्या बाजारपेठांचा शोधासाठी इंटरनेट सारखे महाजालउपयोगी पडताना दिसत आहे. या लेखामध्ये आपण अशाच एका सेवानिवृत्त प्राध्यापकांची यशोगाथा पाहणार आहोत. ज्यांनी कलिंगड लागवड च्या माध्यमातून व्यवस्थित नियोजन करून चक्क कलिंगड हे इराणला निर्यात केले आहेत.

 शेतकऱ्याची यशोगाथा

 बार्शी तालुक्यातील बळेवाडी येथील राजाभाऊ पोकळे एक प्राध्यापक होते. प्राध्यापक पदावरून सेवानिवृत्त झाल्यानंतर आता पुढे काय करायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला. तेव्हा त्यांनी त्यांच्या घरच्या शेतीकडे लक्ष देऊन  शेती करण्याचा निर्णय घेतला वा हा निर्णय घेतल्यानंतर त्यांनी त्यांच्या घरच्या दीड एकर शेतामध्ये कलिंगड लागवड यशस्वी करत 70 ते 75 दिवसांनी मध्ये साडे तीन लाखांपेक्षा जास्तीचे उत्पादन घेऊन एक आदर्श निर्माण केला.

कलिंगड लागवडीची तयारी करत असतांना त्यांनी अगोदर योग्य मार्गदर्शन व माहिती मिळावी यासाठी बार्शी येथील तिरुपती ऍग्रो चे प्रमुख मंगेश बागुल यांच्याशी याबाबत चर्चा करून आपल्या बाबतीत मार्गदर्शन करण्याची विनंती केली. यावेळी बागूल यांनी त्यांना कलिंगडाच्या ज्यावानाला एक्सपोर्ट साठी मागणी असते अशा वाणांची लागवड करण्याचा सल्ला दिला आणि सुरू झाला तो पुढचा प्रवास.

 अशा पद्धतीने केली कलिंगडची लागवड व व्यवस्थापन

 लागवड करणे अगोदर त्यांनी शेताची चांगली नांगरट केली व त्यानंतर शेताची कोळपणी केली व दोन रोपांमध्ये एक फूट अंतरावर दीड एकर क्षेत्रामध्ये 6000 बियाण्यांची लागवड करण्यात आली. खत व्यवस्थापनामध्ये व्यवस्थित प्रमाणे बेसल डोस, मल्चिंग व बियाण्यांची खरेदी करून कलिंगडची लागवड करण्यात आली.

लागवड केल्यानंतर जेव्हा उगवण झाली तेव्हा एच 8 ग्रो बॅक्टर चे पहिली आळवणी करण्यात आली. त्यानंतर सनमुन मेडएक्स व ग्रोकन सोरटीया ग्रोफ फायटोन ची आळवणी तीन दिवसाच्या फरकाने घेण्यात आली. बागूल यांनी दिलेल्या मार्गदर्शना प्रमाणेच शेतकरी पोकळे यांनी सगळे नियोजन व व्यवस्थापन केले. उगवण झाल्यानंतर रोपांच्या वाढीच्या अवस्थेत तसेच फुलकळी च्या अवस्थेमध्ये, फुगवणी वमालतयार होण्याच्या अवस्थेत ट्रीपच्या माध्यमातून खतांच्या योग्य मात्रा देण्यात आल्या तसेच वाढीच्या अवस्थेत वेळोवेळी नाग आळी साठी तसेच थ्रिप्स, करपा, आळी साठी योग्य फवारणी व ठिबक मधून खत व्यवस्थापन केल्याने अतिशय कमी खर्चामध्ये निर्यातक्षम क्वालिटीचे कलिंगड उत्पादन केल्याने प्रत्येक कलिंगड आठ किलो ते 13 किलो वजनाचे तयार झाले. योग्य व वेळेत व्यवस्थापन व अचूक मार्गदर्शनामुळे एका एकरात 22 टन उत्पादन मिळाले. पोकळे यांच्या शेतात तयार झालेले कलिंगड हे उत्तम असल्यामुळे ते खरेदी करण्यासाठी चक्क व्यापाऱ्यांची स्पर्धा निर्माण झाली होती. त्यांनी पिकवलेली कलिंगडे आता परदेशात निर्यात करायला सुरुवात केली असून त्यांच्या कलिंगडाला चांगला दर देखील मिळत आहे. उत्पादन घेताना ते चांगल्या दर्जाचे कसे होईल याची काळजी शेतकरी बांधवांकडून घेणे आवश्यक आहे तसेच ते पण त्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांना देखील फळपीक लागवडीबाबत मार्गदर्शन करीत आहे.

 अशा पद्धतीने केले पाण्याचे व्यवस्थापन

लागवड केल्यानंतर त्यांनी सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये जेमतेम  पंधरा ते वीस मिनिटे पाणी दिले. जेव्हा पिक फुलकळी च्या  अवस्थेमध्ये होते तेव्हा 40 ते 45 मिनिटे, परभणीच्या कालावधी दीड ते दोन तास व पुढे तयार होईपर्यंत दोन तास असे पाण्याच्या मात्रा दिल्या. त्यांना जेवढे उत्पादन मिळाले त्यापैकी 30 टन माल प्रथम श्रेणीचा तर पाच टन कलिंगडे द्वितीय श्रेणीचे निघाले. त्यांच्या एकूण दीड एकराचा खर्च हा 80000 आला असून खर्च वजा जाता दीड एकरात चांगले उत्पन्न मिळाले.

( सौजन्य- मराठी पेपर)

English Summary: take watermelon more production by proper management and study of market Published on: 28 February 2022, 09:28 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters