शिवकांत हा मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रहिवासी आहे. तो गरीब कुटुंबातील आहे. शिवकांतचे वडील भाजीचा गाडा लावून घरखर्च चालवत असत. आणि त्याच वेळी शिवकांतची आई पण काम करायची. शिवकांत हा तीन भावंडांमध्ये दुसरा होता.
घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने शिवकांतने बारावीनंतर वडिलांसोबत काम करायला सुरुवात केली, पण अभ्यास करण्याची इच्छा आणि आवड असल्याने मेहनतीने त्याने अभ्यास देखील सुरूच ठेवला. आज खूप कठोर तपश्चर्येनंतर त्यांनी हे स्थान प्राप्त केले आहे. आजही शिवकांत कच्चा घरात राहतात.
शिवकांत काय म्हटले
शिवकांत सांगतात की, ते भाजीचा गाडा लावायचे आणि एक दिवस जज बनून दाखवेन असे म्हणायचे तेव्हा लोक त्याला वेड्यात काढायचे. पण शिवकांत सांगतात की त्यांचा अंतरात्मा त्यांना यश मिळवून देणार असे ते नेहमी म्हणतं आणि या अंतरात्म्याचा आवाज ऐकून ते पुढे गेले आणि यशाच्या या टप्प्यावर पोहोचलेत.
Mansoon Update: पाऊस आला रे….! राजधानी मुंबईत मान्सून दाखल, जाणून घ्या मान्सूनचा नविनतम अंदाज
एका न्यायाधीशाने वकील बनण्याचा सल्ला दिला
शिवकांत सांगतात की 2007 मध्ये ते उसाच्या रसाच्या दुकानात काम करायचे. तेव्हा तिथे आलेल्या एका न्यायाधीशाने त्यांना सल्ला दिला की तू एलएलबी कर. मग काय शिवकांत यांनी त्यानंतर कठोर परिश्रम घेतले आणि अखेर न्यायाधीश बनले.
त्यानंतर शिवकांतने रीवाच्या ठाकूर रणमत सिंग कॉलेजमधून एलएलबी करायला सुरुवात केली आणि नंतर कोर्टात प्रॅक्टिस करण्याबरोबरच दिवाणी न्यायाधीश होण्याची तयारीही सुरू केली. नऊ वेळा शिवकांत अयशस्वी झाला पण त्याने हार मानली नाही आणि शेवटी दहाव्या प्रयत्नात त्याला यश मिळाले.
3 लाखात खरेदी करा Hyundai i20 Sportz कार, जाणुन घ्या डिटेल्स
शिवकांतची पत्नीही मदत करायची
शिवकांत यांच्या पत्नी व्यवसायाने शिक्षिका आहेत. ती म्हणते की सुरुवातीला ती शिवकांतला मदत करू शकली नाही. पण शिवकांतची मुख्य परीक्षा सुरू झाली की ती शिवकांतच्या कॉपी तपासायची आणि त्यातल्या चुका शोधायची. त्यामुळे शिवकांतला खूप मदत मिळाली.
Share your comments