विषमुक्त शेतीच्या मार्गावर चालत चिरंतन प्रकाशदीप तेवत ठेवणारी एक स्निग्ध प्रकाशज्योत म्हणजेच लक्ष्मी मोरे. (चौंधाणे, ता.बागलण,जि.नाशिक) नैसर्गिक शेतीसाठी झटणारी, ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी अविरत धडपडणारी व्रतस्थ शेती अभ्यासक, साधी जीवनशैली जगणारी सात्विक व्यक्तिमत्वाची लक्ष्मी मोरे म्हणजे शेतीतील तेजस्वी चेहरा. मुळातच त्यांचा पिंड शेतीत निरनिराळे प्रयोग करण्याचा विषमुक्त शेतीतील सर्व तंत्र त्यांनी अभ्यासले आहे. त्यासाठी त्यांनी पद्मश्री पुरस्कार विजेते श्री.सुभाष पाळेकर यांच्या शेतीविषयक शिबिरांचा लाभ घेतला.
पारंपारीक शेती करत असतानाच विषारी किटकनाशके, तणनाशके, रासायनिक खते यांच्या दुष्परिणामांपासून वाचण्यासाठी विषमुक्त शेतकडे वळणे गरजेचे आहे. याची जाणीव त्यांना झाली. एका देशी गाईंच्या आधारे उपलब्धसाधन सामुग्रीचा वापर करत शेती करणे. मुख्य पिकांचा व शेतीचा खर्च इतर आंतर पिकातून भागवणे, पाळेकर गुरुजींच्या मार्गदर्शनातून शेतीसाठी अमृत ठरणारे जीवांमृत, घनजीवामृत, आच्छादन दशपर्णी अर्क, निमा, अग्रीव यांचा वापर शेतीमध्ये त्यांनी केला. नैसर्गिक व विषमुक्त शेतीतून तयार झालेलं उत्पादन शेतकरी ते थेट ग्राहक अशी शेतमालाची वितरण व्यवस्था करण्यासाठी शेतकरी अॅग्रो कंपन्या तसेच शेतकरी गट बांधणीसाठी त्या प्रयत्नशिल आहेत.
लक्ष्मी मोरे यांचा जन्म वटार (तालुका. सटाणा, जि.नाशिक) येथील शेतीप्रधान कुटूंबातील. शेती हा कुंटूबातील एकमेव उद्योग असल्याने शालेय वयातच असतांना लक्ष्मी मारे शेतामध्ये आई वडिलांना जमेल तशी मदत करत असे. गावामध्ये असलेल्या जिल्हा परिषदेच्या शाळेतुन सातवीपर्यंयतचे शिक्षण लक्ष्मी यांनी पूर्ण केले. पुढील शिक्षणासाठी त्यांना शेजारील गावी म्हणजे चौंधाणे येथे जावे लागले. दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले. मग लक्ष्मी मोरे यांचे लग्न उचशिक्षित सिव्हिल इंजिनियर श्री.मधुकर मोरे यांच्याशी झाले. सासर माहेरी दोन्हीकडे वातावरण सुधारक असल्याने आणि दोन्ही कुटूंबामध्ये शेती हा प्रमुख व्यवसाय. लगानंतर श्री.मधुकर मोरे यांच्यासोबत लक्ष्मी मोरे या शहापुरात वास्तव्यास आल्या. मुळातच जिद्दी आणि शिक्षणाची आवड असणाऱ्या लक्ष्मी मोरे यांनी लग्रानंतर मुक्त विद्यापीठातून एम.ए.समाजशास्त्र पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले. पुढे अजून शिकण्याची आस होती. व्यवस्थापनाकडे वळावे या हेतुने व्यवस्थापनातील अत्यंत नामांकित वेलिंगकर इन्स्टियूट ऑफ मैनेजमेंट मधून त्यांनी एम.बी.ए. इन मार्केटिंग पदविका प्राप्त केली.
लक्ष्मी मोरे यांचा पिंड नोकरी करण्याचा नव्हता. काहीतरी वेगळे करूया असं वाटत असतानाच साड्यांची महाराणी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची परंपरा असलेल्या पैठणींचा व्यवसाय त्यांनी घरातूनच सुरू केला. विविध ठिकाणी प्रदर्शनांमध्ये स्टॉल लावले आणि त्यांना उत्तम प्रतिसाद मिळाला. पैठण्यांसाठी प्रसिध्द असणाऱ्या येवला आणि पैठण येथील अनेक विणकर कारागिरांना सोबत घेऊन स्वतंत्र प्रदर्शने देखिल भरविली. या व्यवसायाच्या निमित्ताने अनेक गृहीणी व नोकरदार महिलांचा संपर्क होऊ लागला. व्यवसायाला चांगली साथ मिळाली.
त्यानंतर शहरातील वास्तव्य, भाजीचा व्यवसाय असला तरी शेतीतून मन बाहेर पडेना, लक्ष्मी मोरे व मधुकर मोरे यांनी सेवानिवृत्तीनंतर शेतीकडे आपला मोर्चा वळविला. गावी शेतघर बांधून तीन ठिकाणी फळबाग केली. शेती करतांना लक्षात आले की, रसायनावरची शेती धोकादायक आहे. शेतकऱ्यांमध्ये आज जास्त उत्पन्न काढण्याची स्पर्धा लागली आहे. रासायनिक खते, किटकनाशके, शेती अवजारांमधील आधुनिकीकरण यामुळे पुढे काय नुकसान होईल याचा विचार करण्यासाठी कधी कुणाला वेळच मिळाला नाही. कधी कोणी मागे वळुन बघितलेच नाही.
रसायनांच्या अती वापरामुळे आपली शेतजमिन दुषित केली असून नागरीकांना त्यामध्ये लहान मुले असो, तरुण असो किंवा वयोवृध्द नागरीक असो सर्वजण नवीन आजारांच्या विळख्यात सापडले आहेत. हे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी पद्मश्री पुरस्कार विजेते नैसर्गिक शेतीचे प्रणेते डॉ. सुभाष पाळेकर यांचे नैसर्गिक शेतीवरच शिबिरात सहभागी होऊन व याच धर्तीवर लक्ष्मी मोरे आणि मधुकर मोरे दाम्पत्याने प्रत्यक्षात शेती चालू केली. त्याचे उत्तम परिणाम दिसू लागले.
*गायत्री नॅचरल फार्म
आज गायत्री नॅचरल फार्म मार्फत १८ जातीच्या फळबागांची लागवड केली असून सोबत नैसर्गिक उत्पादने घेत आहेत. शेती उत्पादनामध्ये प्रामुख्याने गहू, ज्वारी, बाजरी, हरभर, मोहरी, कांदा, लसून, बटाटा, सर्व भाजीपाला इत्यादींचा समावेश आहे. विक्री व्यवस्थेमध्ये स्वतः लक्ष घालून दर शनिवारी, रविवारी मुंबई, ठाणे येथे शेती उत्पादने ग्राहकांना घरपोच सेवा दिली जातात. या बरोबरीने तयार होणाऱ्या शेतमालाचे विपनन करणे. महाराष्ट्र राज्य तसेच संपूर्ण भारतात जेथे नैसर्गिक शेती होते. त्या शेतकऱ्यांना शेतमालासाठी मार्केट उपलब्ध करून देण्यासाठी मदत देखिल लक्ष्मी मोरे करत असतात.
*पुरस्कार मान सन्मान
लक्ष्मी मोरे यांना त्यांच्या उद्योग क्षेत्रातील योगदानासाठी अनेक पुरस्कार आणि मान सन्मान प्राप्त झाले असुन त्यापैकी नाविन्य पूर्ण उद्योगासाठी उद्योगासाठी उद्योगश्री पुरस्कार, नवदुर्गा पुरस्कार राज्यस्तरीय कृषी रत्न पुरस्कार, मनुष्यबळ विकास फाउंडेशनतर्फे राज्यस्तरीय कर्तृत्वान महिला नारी पुरस्कार तत्कालिन राज्यपालांच्या हस्ते डायनॅमिक सोशल लीडर अॅवॉर्ड, केदराई कृषी ग्रामविकास संस्थेचा पुरस्कार असे अनेक मानसन्मान आणि पुरस्कार प्राप्त झाले आहेत. शालेय विद्याथ्यांसाठी सामाजिक काम वटार येथे सावित्रीबाई फुले हायस्कुलमध्ये सेवा सुविधांचा अभाव होता. यामुळे दुर्गम भागातील शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनीची कुंचबना होता. या पार्श्वभुमीवर लक्ष्मी मोरे यांनी टिम फॅब फाउंडेशनच्या मदतीने शाळेसाठी लाखो रूपये खर्चुन विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.
*शेतीतील प्रयोगाचे वडीलांकडून धडे
माझे वडील कै.रामदास नथु खैरनार (मु.पो.वटार, ता. बागलाण, जि.नाशिक) हे पांरपारीक शेतकरी होते. त्यामुळे मी माझ्या बालपणापासून शेतीचे धडे गिरविलेले आहेत. तशातच माझे सासर सुध्दा एक शेतकरीच आहेत. दोन्ही कडील वारसा शेतकरीचा असल्याने सहाजिकपणे मी शेतीतच रमले काळ्या मातीची नाळ जोडली गेली. सुरुवातीला आम्ही पांरपरिक शेती करायचो. आम्ही उस, कांदा, मका, इत्यादी पिके घेत असून सन २०१६ मध्ये नैसर्गिक शेतीचे प्रणेते आणि प्रसारक पद्मश्री डॉ. सुभाष पाळेकर संपर्कात अगदी योगायोगाने आले. आम्ही शेतकरी कंपनीच्या रजिस्ट्रेशन साठी पुणे येथे जात येत असुन त्यांनी मला एके दिवशी सांगितले की, पुणे, कोंढवा येथे श्री. पाळेकर गुरुजींचे शिबीर आहे. तुम्हाला जर हवे असल्यास सहभाग नोंदवा ताबडतोब मी त्या महाशिबीरात सहभाग नोंदवला. ते शिबीर तब्बल ९ दिवसांचे होते. या ९ दिवसात मी पुर्णपणे भारावले. माझ्या शेतीबद्दलच्या कल्पना आणि दिशाच बदलली आता आपण रासायनिक शेती बंद करून नैसर्गिक शेती करावी असा पका निर्धार केला. आणि २०१६ पासून प्रत्यक्षात नैसर्गिक शेतीचे प्रयोग सुरू केले. सुरुवातीला ऊस लावले नंतर परंपरागत शेतीचे तंत्र बदलून एकल पिक पध्दत बंद करून आहे. त्या क्षेत्रामध्ये अनेक पिके सहजिवन पिके, फळे, धान्य, कडधान्य, तेलबिया असे अनेक विविध पिकांची योजना करून तो यशस्वीपणे उत्पादने घेतली. आता आम्ही अन्नधानाच्या बाबतीत स्वयंपूर्ण असुन आपल्या स्वयंपाक घरात लागणारे सर्व अन्नधान्य आम्ही शेतातूनच उत्पादित केली आहेत.
*नैसर्गिक खते
१) घन जिवामृत- देशी गायीच्या शेण गोमुत्रापासून निर्मिती
२) जिवांत देशी गायीच्या शेण गोमुत्र + गुळ बेसन पासून निर्मिती
३) झाडपाला अर्क शेतीतील गवत, शेवगा, एरंडी, निमपत्ते, इत्यादी पानांचा अर्क
४) केळी अतिपक केळी पासून फॉस्पेट खताची निर्मिती
५) सिजवलेला तांदुळ गुळ निर्मित पुरक खते
६) सप्तधान्यांचा अर्क
७) बेल फळांचा अर्क / फळापासून एन्झमाईन इत्यादी खते व वेळो वेळी नव्याने शेतीत निविष्ठा तयार केल्या जातात.
*एकात्मिक किड नियंत्रण
नैसर्गिक शेतीचा काटेकोर अवलंब केला असता हळूहळू जमिनीचा पोत सुधारत जातो. जमिनीची उत्पादकता वाढते. पर्यायाने रोग प्रतिकात्मक परिस्थिती आपोआप निर्माण होते. तथापी खबरदारी म्हणून पुढील प्रमाणे उपाय योजना करून पिके रोगराई पासुन वाचवू शकते.
१) दशपर्णी अर्क
२) निमार्क किंवा निमास्त्र
३) अजिय
४) जिवामृत फवारणी
५) ताकाची फवारणी
६) घरगुती मसाले जसे हिंग, इत्यांदीची फवारणी
*पिकांसाठी टॉनिक
१) सप्तधान्यांकुर अर्क
२) को नारळ पाणी
३) फळांचा ज्युस इत्यादी
*आमचे ध्येय
प्रत्येक शेतकऱ्याने किमान घरासाठी लागणाऱ्या विषमुक्त धान्यांचे/कडधान्यांचे /तेलबीयांचे /भाजीपाल्याचे उत्पादन आपल्या शेताच्या छोट्या पार्टमध्ये घ्यावेत. शेतकरी आत्मनिर्भर व्हावा. स्वंयपूर्ण व्हावा, एकल पिक पध्दती टाळून विविध पिकांची योजना करावी. जेणेकरून आकस्मात होणारा तोटा मानसिक ताण, निर्माण करणार नाही. यासाठी जन जागृती करावी असे आमचे ध्येय आहे.
*कोविडमध्ये मदत आणि भाजीपाला विक्री
कोविडच्या महामारीत अनेकांचे हाल झाले. अत्यावश्यक सेवा सुरु होती तेव्हा आम्ही रहात असलेल्या कॉम्प्लेक्स मधील रहिवाशांना त्यांच्या मागणीनुसार ताजा भाजीपाला, नैसर्गिक, धान्य पोहोचविले जात होते. या कामी आम्ही तयार केलेल्या वाडा तालुकाल्यातील २५ शेतकरी ग्रुपचा सहाय्य घेतले गेले. त्यांनाही शेतमाल विकता आला आणि गरजुंना खाण्याच्या वस्तु मिळाल्या. आम्ही मे २०२० पर्यंत ठाणे येथील घरी अडकुन होतो. मात्र १८ मे २०२० रोजी परवानगी मिळताच गाव गाठले. मदत कार्य चालूच होते. पहिला प्रकोप संपला होता. हो, ना करता कोविडचा दुसरा प्रकोप सुरू झाला. या टप्यात ग्रामीण भागात मोठा उत्पात घडून गेला. माहितीचा अभाव, वैद्यकिय सुविधांचा अभाव यामुळे अनेक जन प्राणास मुकले. दररोज २ ते ३ नातेवाईक बळी जात होते. काहिच कळत नव्हते. त्यावेळी आमच्या शेतात मोठ्या प्रमाणात पपई पिक तयार होते. त्यामुळे कित्येक पेशंट यांना पपई विनामुल्य वाटण्यात आली.
तसंच डांगसौंदाणे येथील ग्रामीण रुग्णालयात ५ ऑक्सिजन पुरवठा यंत्रे पुरविण्यात आले. पेशंटसाठी थोडा दिलासा मिळाला. डॉक्टर आणि इतर स्टॉफ साठी विनामुल्य घरगुती जेवणाची व्यवस्था केली. मुंजवाड शिवारात स्थलांतरीत मेंढपाळ कुटूंबावर मोठी आफत ओढवली काही. पेशंट मृत्युमुखी पावले त्यांना रेशनची व्यवस्था होत नव्हती. कारण स्थलांतरांना रेशन कार्ड मिळाले नव्हते. अशा कुटूंबाना रेशन वाण सामानाचे वाटप केले. एका पिडीत कुंटूबांची वर्षभरासाठी जबाबदारी घेतली. त्यांना वर्षभर पुरेल एवढे धान्य प्रत्येकी दोन जोडी कपडे इत्यादी पुरविण्यात आले. मदतीचा ओघ चालुच होता. अशातच मुरबाड तालुका (ठाणे) येथील आदिवासी दुर्गम भागातून मदतीसाठी मागणी झाली. आमच्या याच भागात काम करणाऱ्या मित्रांच्या मदतीने त्यांच्या सुधा गरजा पूर्ण करण्यात आल्या. कार्य चालुच होते. प्रकोप कमी झालेला होता. आणि एके दिवशी राज्यपाल महाराष्ट्र शासन यांचे कार्यालयाकडून दुरध्वनी आली. आमच्या ध्यानी मनी नसतांना मला (dynamic leadership award covid warriors) साठी निवडूण माझा गौरव करण्यात आला.
*मुंबईतील ग्राहकांना थेट भाजीपाला सेवा पुरविणे
शेतकऱ्यांना मुंबई महानगरात शेतमाल विक्रीस मदत करणे. मुंबईतील नोकरपेशा महिलांना दिलासा देणे मुंबई, ठाणे, पुणे या महानगरात महिला नोकरी करतात. आपल्या कुटूंबाच्या पालन-पोषनात मोठा भार उचलतात. मात्र तिचे हे योगदान खुपच कष्टप्रद नव्हे अत्यंत जिद्दिचे असते. लवकर उठून घरे स्वता: आवरणे जेवण बनविणे, मुलांना शाळेसाठी तयार करणे आणि वेळेत ऑफीस गाठणे. त्यासाठी गर्दी ने खचाखच भरलेल्या लोकल ट्रेनचा प्रवास, दिवसभर ऑफीसचे काम आणि परत संध्याकाळी उलट प्रवास, रात्रीचे जेवन बनविणे केव्हढी कसरत...! गृहीणीचा हा प्रवास किंचीत हलका-फुलका करावा, थोडीशी मदत करावी हा विचार प्रकर्षाने समोर आला आणि कल्पना सुचली आणि प्रत्यक्षात आली ती लक्ष्मीज् फॉर्म फ्रेश व्हेजीटेबल ही संस्था. या संस्थेचा उद्देश थेट शेतकऱ्यांकडून भाजीपाला घेऊन तो ठाणे येथील आमच्या वर्कशॉप मध्ये स्वच्छ करून पाहिजे . त्या आकारात कटींग करून पॅकेट तयार करून थेट गृहीनींच्या घरी आपोआप सेवा देणे हा ठेवला त्यासाठी १२/१५ मुली / वितरणासाठी मुले, स्कुटर्स, व्हॅन असा जामानिमा तयार झाला. आणि व्यवसाय सुरू झाला.
मुंबई मधील अनोखा व्यवसाय गृहीनींच्या स्वयंपाक गृहात त्यांना हवी असलेली स्वच्छ कापलेली भाजी, सलाड, निंबु, आले, कोथंबीर मोड आलेले कडधान्य आदि पोहचवू लागली. गृहीनींना खुप प्रचंड दिलासा मिळू लागला. त्यांच्या कष्टाचा काहीतरी भाग आमच्या संस्थेने उचलला. ठाणे, मुलूंड, कळवा या परिसरात सेवा दिली. मुंबई येथील अनोखा व्यवसाय म्हणून न भुतोन भविष्य ती असा प्रतिसाद मिळाला. व याची पोहच पावती म्हणून प्रतिष्ठेचा उद्योगश्री पुरस्कार प्राप्त झाला. कृषी विभागाचे मुख्य सचिव श्री सुधिर गोयल सर आमच्या संस्थेच्या भेटीला आले होते. त्यांनी आमच्या कार्याची प्रशंषा केली. त्यांच्या सोबतीने शेतकरीने व ग्राहक मेळावे घेतले. मार्गदर्शन केले. शेतकरी मित्र म्हणून कामे केलीत. आज सुध्दा हा वसा कायम ठेवला आहे. आमच्या शेतकरी दादांना मदत म्हणून त्यांच्या शेतमालास मदत म्हणून त्यांच्या शेतमालास योग्य बाजार पेठ मिळवून त्यांच्या कष्टाचे फख त्यांच्या पदरी देण्याचे काम चालु आहे. महाराष्ट्र व भारतातील नैसर्गिक शेतमाल विक्री व्यवस्था उभी केली आहे. त्याला मोठे स्वरूप देण्याचे काम सुरू आहे.
Share your comments